मुंबई : अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यामध्ये मुंबई पोलिसांनी अटक केलेला आरोपी बांगलादेशी असल्याचा पोलिसांना संशय होता. याबाबत पोलिसांना आरोपी बांगलादेशीच असल्याचा सज्जड पुरावा मिळालाय. त्यामुळं आरोपी बांगलादेशी असल्यावर शिक्कामोर्तब झालंय. याबाबतचा पुरावा पोलिसांनी समोर आणलाय.
आरोपीचे ड्रायव्हिंग लायसेन्स सापडले : सैफ अली खान प्रकरणात अटक केलेला आलेला हा बांगलादेशी असल्याचा पुरावा मुंबई पोलिसांना सापडला आहे. त्यामुळं मुंबई पोलिसांच्या दाव्याला बळकटी मिळाली. पोलिसांनी केलेल्या तपासा दरम्यान आरोपीचे ड्रायव्हिंग लायसेन्स आणि इतर कागदपत्र मिळाले आहेत. त्यानुसार हा आरोपी बांगलादेशचा नागरिक असल्याचं स्पष्ट झालंय.
पोलिसांनी समोर आणलेला पुरावा (Source : Mumbai Police/ETV Bharat Reporter) बांगलादेशी नागरिकांविरोधात कारवाई : मुंबई पोलिसांनी ठाण्याच्या हिरानंदानी परिसरातील झुडपांमध्ये लपलेल्या आरोपीला अटक केली होती. सैफ अली खानवर वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात उपचार करण्यात आले. नुकताच त्याला रुग्णालयातून डिस्चार्च देण्यात आलाय. सैफ अली खानचा हल्लेखोर हा बांगलादेशी असल्याचे समोर आल्यानंतर मुंबई व परिसरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात कारवाई करण्यास वेग आलाय. चोरी व हल्ल्यानंतर सैफ अली खानला मुंबई पोलिसांनी संरक्षण पुरवले आहे. तसेच, सैफने खासगी सुरक्षा रक्षकांची सेवा देखील स्वीकारली आहे.
हेही वाचा :
सैफ अली खान चाकू हल्ला प्रकरणात मोठी अपडेट; 19 ठिकाणांच्या फिंगरप्रिंटचा तपास सुरू
- सैफला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज; शूटिंगला काही दिवस विश्रांती
- बांगलादेशी घुसखोरांविरोधात त्वरित कठोर कारवाई करा; केंद्रीय गृहमंत्रालयाचे निर्देश