जळगावMinor girl raped and killed:जळगावच्या जामनेर तालुक्यातील एका गावात आदिवासी कुटुंबातील एका सहा वर्षे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलीचा मृतदेह जळगाव जिल्ह्यातील रुग्णालयात आणण्यात आला असून तिच्या नातेवाईकांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. तर आरोपीला अटक करून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी आरोपीच्या नातेवाईकांनी केली आहे.
अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी प्रतिक्रिया देताना स्मिता वाघ (ETV Bharat Reporter) अत्याचार करून खून :याघटनेनं जळगाव जिल्हा हादरला असून घटनेबाबत संताप व्यक्त केला जात आहे. जामनेर तालुक्यातील एका गावात सहा वर्षे मुलीला आरोपी तरुणाने तुला खाऊ घेऊन देतो असं आमिष दाखवलं आणि अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर तिचा खून केला. अत्याचाराचा आरोपी फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान या घटनेने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे.
ठाण्यातही घडली होती अशीच घटना : अज्ञात नराधमाने सहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडी शहरालगतच्या कोनगाव परिसरात 29 ऑक्टोबर, 2019 रोजी उघडकीस आला होता. यानंतर आरोपीने संबंधित पीडित मुलीचा गळा आवळून खून केला असून, सरवली पाड्याजवळील पाईपलाईन येथील निर्जनस्थळी ही घटना घडली आहे. याप्रकरणी एका संशयित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मृतदेह झुडुपात आढळला : पीडितेचे आई-वडील हे मूळचे बिहार (नालंदा) येथील रहिवासी असून ते मोलमजुरीच्या कामासाठी गेल्या सहा वर्षांपासून सरवली येथील एमआयडीसीमध्ये स्थायिक झाले होते. दिवाळीची सुट्टी असल्याने चिमुकली कुटुंबीयांसोबत घरात होती. मात्र, सायंकाळी घराबाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाल्याने तिचा सर्वत्र शोध सुरू झाला. दरम्यान सकाळी तिचा मृतदेह पाईपलाईन लगतच्या एका झुडपात आढळून आला.
वैद्यकीय अहवालावरून खुलासा : घटनेची माहिती कोनगाव पोलिसांना मिळताच पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश काटकर, आदींनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. वैद्यकीय अहवालानुसार संबंधित मुलीवर बलात्कार करून तिचा गळा आवळून हत्या झाल्याचं निष्पन्न झालं होतं.
हेही वाचा :
- चंद्राबाबू नायडूंनी घेतली आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ, पवन कल्याण उपमुख्यमंत्री - Chandrababu Naidu
- अजित पवारांना सोबत घेऊन भाजपानं आपली ब्रँड व्हॅल्यू कमी केली; संघाच्या मुखपत्रातून भाजपाला 'घरचा आहेर' - RSS Mouthpiece Criticize To BJP
- माऊलींचा पालखी रथ ओढण्याचा २५ वर्षानंतर कुऱ्हाडे कुटुंबाला मान, पाहा 'बाजी- हौशा' बैलजोडीची तयारी - Ashadhi Ekadashi 2024