महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक जिल्हा परिषदेत दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा? 59 कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राबाबत संशय - Disabled Certificate Scam In Nashik - DISABLED CERTIFICATE SCAM IN NASHIK

Disabled Certificate Scam In Nashik : आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राचा घोळ गाजत आहे. त्यातच आता नाशिक जिल्हा परिषदेतील विविध विभागातील 59 अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र अर्थात युडीआयडी कार्ड सादर न केल्यामुळे जिल्हा परिषदेत दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा झाला असावा, असा संशय व्यक्त केल्या जात आहे. जाणून घ्या काय आहे प्रकरण...

Disabled Certificate Scam In Nashik
जिल्हा परिषद, नाशिक (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 31, 2024, 6:51 PM IST

नाशिकDisabled Certificate Scam In Nashik :नाशिकचे जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र बनावट आढळल्याने फेब्रुवारी, 2024 मध्ये खळबळ उडाली होती. अशात आता नाशिक जिल्हा परिषदेतील विविध विभागातील 59 अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र अर्थात युडीआयडी कार्ड सादर न केल्यामुळे जिल्हा परिषदेत दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे उपकार्यकारी अधिकारी परदेशी यानी माहिती दिलीय.

नाशिक जिल्हा परिषदेच्या आस्थापना प्रशासनाकडून संपूर्ण विभागनिहाय दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेतील 609 कर्मचाऱ्यांपैकी 540 कर्मचाऱ्यांनी युडीआयडी कार्ड सादर केले आहेत. अद्याप 59 जणांचे युडीआयडी कार्ड सादर झाले नाही. 31 जुलै ही अंतिम मुदत होती,आता त्यांना नोटीसा पाठवण्यात येणार आहे. - रवींद्र परदेशी, नाशिक जिल्हा परिषदचे उप कार्यकारी अधिकारी

युडीआयडी कार्ड सादर करावे - सीईओ :नाशिकचे जिल्हा परिषदेच्या आस्थापना प्रशासनाकडून संपूर्ण विभागनिहाय प्रमाणपत्र पडताळणी करण्यात येत आहे. त्यात जिल्हा परिषदेच्या 609 कर्मचाऱ्यांपैकी प्रारंभीच्या टप्प्यात 411 दिव्यांग कर्मचाऱ्यांनी त्यांचे युडीआयडी कार्ड सादर केले होते. एप्रिल 2024च्या मध्यापर्यंत देखील त्यातील तब्बल 198 जणांकडे युडीआयडी कार्ड नसल्याचं समोर आलं होतं. त्यावेळी उर्वरित 198 कर्मचाऱ्यांनी त्यांचे युडीआयडी कार्ड सादर करावे, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी अस्मिता मित्तल यांनी दिल्या होत्या. त्यानंतर वारंवार मुदतवाढ देऊनही जुलै अखेरपर्यंत तब्बल 59 कर्मचाऱ्यांनी युडीआयडी कार्ड दिलेले नसल्यानं त्यांची प्रमाणपत्रे संशयाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही.


'या' विभागातील अधिकारी, कर्मचारी :जिल्हा परिषदेच्या युडीआयडी कार्ड न देणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे प्राथमिक, पदवीधर शिक्षकांचे आहे. युडीआयडी कार्ड सादर न केलेल्या 59 जणांमध्ये आरोग्य विभाग, सामान्य प्रशासन विभाग, ग्रामपंचायत विभाग, शिक्षक आणि महिला व बालविकास विभागातील अधिकारी आणि कर्मचारी आहेत की, ज्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र सादर केलेलं नाही. त्यामुळे आता या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर जिल्हा परिषद नेमकी काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


युडीआयडी कार्डधारक संख्या :
1) जिल्हा परिषद एकूण मंजूर पदे- 18 हजार 668
2) जिल्हा परिषद एकूण कर्मचारी- 15 हजार 113
3) दिव्यांग प्रमाणपत्र असलेले कर्मचारी- 609
4) युडीआयडी कार्ड असलेले कर्मचारी - 540
5) युडीआयडी कार्ड नसलेले कर्मचारी- 59

हेही वाचा :

  1. UPSC ने पूजा खेडकर यांच्यावर भविष्यातील सर्व परीक्षा देण्यावर घातली कायमची बंदी - Puja Khedkar debared
  2. बनावट प्रमाणपत्र प्रकरणात पूजा खेडकर यांची अटकपूर्व जामीनसाठी न्यायालयात धाव, काय झाला निर्णय? - IAS Pooja Khedkar updates
  3. "पूजा खेडकर यांनी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी दिले दोन पत्ते; मदत करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा" - Vijay Kumbhar on Pooja Khedkar

ABOUT THE AUTHOR

...view details