लोणावळा5 people washed in Bhushi Dam : लोणावळ्यात पर्यटनासाठी गेलेले पाच जण भुशी धरणात वाहून गेले आहेत. भुशी डॅमच्या पाठीमागील जंगलातील धबधब्यावर ही घटना घडली आहे. यामध्ये लहान मुलांसह महिलेचा समावेश आहे. सध्या वाहून गेलेल्या पर्यटकांचा शोध सुरू आहे.
4 लहान मुलांसह 1 महिलेचा समावेश :लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरातील बॅकवॉटर धबधब्यात पुण्यातील सय्यद नगर भागातील पाच जणं पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून जात भुशी धरणात बुडाली. पाण्याचा अंदाज न आल्यानं ते पाण्यात वाहून गेले. लोणावळ्यात वर्षाविहारासाठी गेलेल्या एका कुटुंबातील पाच जण भुशी डॅममध्ये वाहून गेल्यानं भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये 4 लहान मुलांसह 1 महिलेचा समावेश आहे. हे सर्वजण पुण्यातील रहिवासी आहेत. भुशी धरणाच्या पाठीमागं असलेल्या डोंगरातील वॉटर फॉलवर अन्सारी कुटुंब वर्षाविहाराचा आनंद लुटत होते. पाय घसरुन हे सर्वजण वाहून गेल्याची भिती आहे. या धबधब्याचं पाणी भुशी धरणात येते.