मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्निल नीला (Source reporter) मुंबई Central Railway Mega Block Update : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकातील फलाटाच्या विस्तारीकरण म्हणजेच लांबी वाढवण्यासाठी मध्य रेल्वे कडून 36 तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉकचा लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लोकल वाहतुकीवर परिणाम होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल नीला यांनी दिली.
36 तासांचा मेगाब्लॉक :मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11 ची लांबी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. फेज वनमधील तो ब्लॉक 16 मे पासून सुरू आहे. तसंच काही रेल्वे गाड्या दादर रेल्वे स्थानकात शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या असून यासाठी अंतिम आणि महत्त्वाचा असलेला ब्लॉक 1 आणि 2 जून रोजी घेण्यात येईल. या ब्लॉकचा संपुर्ण कालावधी 36 तासांचा असेल. ब्लॉकदरम्यान भायखळापासून ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंतच्या सर्व लाईन बंद करण्यात येतील. तसंच लांब पल्ल्याच्या गाड्यांना वेगवेगळ्या ठिकाणी थांबवण्यात येईल अथवा तिथंच टर्मिनेट केलं जाईल.
मेल एक्सप्रेस रद्द :या मेगा ब्लॉकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडं जाणाऱ्या मेल एक्सप्रेस रेल्वेगाड्या दादरमध्ये 22, पनवेल 3, ठाण्यात 2, पुणे 5 आणि नाशिकमध्ये 1 शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहे. याच वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसऐवजी दादरवरून 20 मेल- एक्स्प्रेस, पुण्यातून 5, पनवेलहून 3, आणि नाशिकहून 1 गाडी सोडण्यात येईल.
मध्य रेल्वेचं आवाहन :या मेगाब्लॉकच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना आवाहन करत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ स्वप्निल नीला म्हणाले की, "मेगाब्लॉकमुळं प्रवाशांची गैरसोय होईल. मात्र, हा त्रास भविष्यातील लॉंग टर्मच्या फायद्यासाठी आहे. त्यामुळं आपल्याला हा ब्लॉक सहन करावा लागेल. ब्लॉकवेळी प्रवाशांनी मध्य रेल्वेला सहकार्य करावं. तसंच शनिवारी आणि रविवारी ब्लॉक असल्यामुळं प्रवाशांनी नियोजन बघूनच घराबाहेर पडावं", असं आवाहन स्वप्निल नीला यांनी केलं. तसंच या ब्लॉकचा कालावधी सुरुवातीला 72 तासांचा होता. मात्र प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून ब्लॉकचा कालावधी 36 तासांचा करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा -
- उन्हाळी सुट्टीत गावाला जाण्याचा प्लॅन करताय? आधी हे रेल्वेचे वेळापत्रक पाहा मगच घराबाहेर पडा - Train Schedule
- बोरिवली-भाईंदरदरम्यान आज मेगाब्लॉक, वाचा आजचं रेल्वेचं वेळापत्रक
- मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे लाईनवर मध्यरात्रीपासून मेगाब्लॉक, 'या' गाड्या धावणार उशिरा