मुंबईCM Medical Assistance Fund :मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून रुग्णाना मदत मिळाली आहे. दुर्धर आजारानं ग्रस्त रुग्णांना गेल्या 2 वर्षांत एकूण 285 कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मिळाली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून राज्यातील हजारो रुग्णांना यामुळं जीवदान मिळालं आहे.
प्रत्येक रुग्णाला मदत मिळाली पाहिजे : मागील 2 वर्षांत 35 हजारपेक्षा अधिक गोरगरीब, गरजू रुग्णांना एकूण 285 कोटी रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून वितरित केली आहे. या कक्षाला मिळणारा चांगला प्रतिसाद पाहून, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष हा महाराष्ट्र राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना ठरत असल्याचं संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसंच येथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला मदत मिळाली पाहिजे. एकही रुग्ण मदतीविना वंचित राहायला नको, अशी दक्षता घेण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.