महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

थरांचा थरथराट आला गोविंदांच्या अंगलट: मुंबईतील दहीहंडी उत्सवात आतापर्यंत 238 गोविंदा जखमी, कोणतीही जीवितहानी नाही - Dahi Handi Festival 2024 - DAHI HANDI FESTIVAL 2024

Dahi Handi Festival 2024 : मायानगरी मुंबईत कृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी उत्सव 2024 मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला आहे. गोविंदा पथकानं मोठ्या उत्साहात थरांच्या थरथराटाला गवसणी घातली. मात्र यावेळी मुंबईत तब्बल 238 गोविंदा जखमी झाले. त्यांच्यावर मुंबईतील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Dahi Handi Festival 2024
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 28, 2024, 7:47 AM IST

मुंबई Dahi Handi Festival 2024:मुंबईत जन्माष्टमीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वेगवेगळ्या दहीहंडी उत्सव 2024 च्या कार्यक्रमात आतापर्यंत 238 गोविंदा जखमी झाल्याची माहिती महापालिकेनं दिली आहे. या सर्व जखमी गोविंदांना उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं देखील पालिकेनं नमूद केलं आहे. मुंबईत गोविंदांचा उत्साह आणि दरवर्षी होणारे अपघात लक्षात घेता पालिकेनं यावर्षी दक्षता घेतली असून, केईएम रुग्णालयात जखमी गोविंदांसाठी 10 राखीव खाटा ठेवण्यात आल्याचं पालिकेनं जाहीर केलं आहे. सोबतच ज्या जखमी गोविंदांना अस्थिरोग तज्ञांची गरज असेल, अशा ठिकाणी अस्थिरोग तज्ञ देखील तैनात ठेवण्यात आले असल्याचं महापालिकेनं म्हटलं आहे.

32 गोविंदांना अधिक उपचाराची गरज :मुंबईत कृष्ण जन्माष्टमीनिमित्त आयोजित दहीहंडीदरम्यान वेगवेगळ्या घटनांमध्ये आतापर्यंत 238 गोविंदा जखमी झाल्याचं महापालिकेनं म्हटलं आहे. या सर्व 238 गोविंदांना अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली या जखमी गोविंदांवर उपचार सुरू असल्याचं महापालिकेनं म्हटलं आहे. महापालिकेनं दिलेल्या माहितीनुसार, यातील 32 गोविंदांना अधिक उपचाराची गरज असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यातील 24 गोविंदांना प्राथमिक उपचाराची गरज असून त्यांच्यावर ते उपचार सुरू आहेत. पैकी 205 गोविंदांना उपचारांती त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानं डिस्चार्ज देण्यात आला आहे.

या ठिकाणी सुरू आहेत गोविंदांवर उपचार :या सर्व जखमी गोविंदांपैकी जे जे हॉस्पिटलमध्ये 4 गोविंदांवर उपचार सुरू आहेत. 8 गोविंदांवर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जी टी रुग्णालयात 5 गोविंदांना दाखल करण्यात आलं आहे. पोद्दार रुग्णालयात 18 गोविंदांवर उपचार सुरू आहेत. केईएम रुग्णालयात 52 गोविंदांवर उपचार सुरू आहेत. नायर रुग्णालयात 12 गोविंदांना दाखल करण्यात आलं आहे. सायन रुग्णालयात 20 गोविंदांवर उपचार सुरू आहेत. राजावाडी रुग्णालयात 13 गोविंदांवर उपचार सुरू आहेत. एम टी अग्रवाल रुग्णालयात 2 गोविंदाला दाखल करण्यात आलं आहे. कुर्ल्यातील भाभा रुग्णालयात 5 गोविंदांवर उपचार सुरू आहेत. गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात 12 गोविंदांवर उपचार सुरू आहेत. वांद्रे येथील भाभा रुग्णालयात 6 गोविंदांवर उपचार सुरू आहेत. कांदिवलीतील आंबेडकर रुग्णालयात 15 गोविंदावर उपचार सुरू आहेत. ट्रॉमा केअर रुग्णालयात 17 गोविंदांवर उपचार सुरू आहेत. तर व्ही एन देसाई रुग्णालयात 24 गोविंदांवर उपचार सुरू असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागानं दिली आहे.

हेही वाचा :

  1. ढाक्कू माक्कूम ढाक्कू माक्कूम! मुंबईत दहीहंडी फोडण्यास सुरुवात; महिला गोविंदांचाही मोठा सहभाग - Dahi Handi Festival 2024
  2. "नट, नट्यांचे बीभत्स नृत्य दाखवण्यापेक्षा...", दहीहंडी समन्वय समितीनं व्यक्त केली नाराजी - Dahi Handi Dance
  3. गोविंदा आला रे... आला..., 'या' आहेत मुंबईच्या प्रसिद्ध दहीहंड्या - Dahi Handi 2024

ABOUT THE AUTHOR

...view details