महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नेदरलँडची कीस्‍टोनमॅब कंपनी म‍िहानमध्‍ये उभारणार 200 कोटींचा फार्मा युनिट, एमएडीसीसोबत केला सामंजस्‍य करार

Pharma Unit In Mihan: नागपुरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत परिसरात आयोजित खासदार औद्योग‍िक महोत्‍सव अ‍ॅडव्‍हांटेज विदर्भला नागरिकांचा (MP Industrial Festival) आणि नामांकित कंपन्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. (Advantage Vidarbha) यात महत्त्वाची भर म्हणजे, येथे आज (28 जानेवारी) एमएडीसी आणि नेदरलँडची कंपनी कीस्‍टोनमॅब यांच्‍यामध्‍ये डोज-फॉर्म सोल्‍युशन्‍सच्‍या निर्मिती प्रकल्‍पासाठी करार झाला. हा प्रकल्प 200 कोटी रुपयांचा असणार आहे.

200 crore pharma unit
सामंजस्‍य करार

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 28, 2024, 10:52 PM IST

नागपूर Pharma Unit In Mihan:महाराष्‍ट्र एअरपोर्ट डेव्‍हलपमेंट कंपनी लिमिटेड (एमएडीसी) आणि नेदरलँडची कंपनी कीस्‍टोनमॅब (Keystonemab Company) यांच्‍यामध्‍ये आज खासदार औद्योग‍िक महोत्‍सव अ‍ॅडव्‍हांटेज विदर्भमध्‍ये 200 कोटी रुपयांचा प्रकल्‍प स्‍थापन करण्‍याकरिता सामंजस्‍य करार करण्‍यात आलाय. ही नागपूर आणि विदर्भासाठी मोठी उपलब्‍धी मानली जात आहे.

खासदार औद्योगिक महोत्सवात फार्मास्‍युटीकल क्षेत्राचे चर्चासत्र :असोसिएशन फॉर इंडस्‍ट्रीयल डेव्‍हलपमेंटच्या (एड) वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या संकल्‍पनेतून खासदार औद्यो‍गिक महोत्‍सव अ‍ॅडव्‍हांटेज विदर्भचे राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्‍या प्रशासकीय इमारतीच्‍या परिसरात आयोजन करण्‍यात आले आहे. आज महोत्‍सवाच्‍या दुसऱ्या दिवशी फार्मास्‍युटीकल क्षेत्राच्‍या चर्चासत्रादरम्‍यान एमएडीसी आणि नेदरलँडच्‍या कंपनीच्‍या अधिकाऱ्यांनी या सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षरी केली.


शेकडोंना प्रत्‍यक्ष-अप्रत्‍यक्षरित्‍या रोजगार :म‍िहान सेझमध्‍ये नेदरलँडची कीस्‍टोनमॅब कंपनी नाविन्‍यपूर्ण डोज-फॉर्म सोल्‍युशन्‍सच्‍या निर्मिती प्रकल्‍प स्‍थापन करणार आहे. याद्वारे शेकडो लोकांना प्रत्‍यक्ष-अप्रत्‍यक्षरित्‍या रोजगार म‍िळणार आहे. याशिवाय, ३०० कोटीचा वार्षिक महसूल देखील प्राप्‍त होणार आहे.

करारादरम्यान या मान्यवरांची उपस्थिती :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍या उपस्‍थ‍ितीत कीस्‍टोनमॅबचे सीईओ डॉ. तुषार सातव, सीसीओ डॉ. रोलँड मिजेल आणि एमएडीसी लिमिटेडचे निवृत्त अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी प्रकाश पाटील यांनी करारावर स्‍वाक्षरी केली. यावेळी एडचे अध्‍यक्ष आशिष काळे आणि सचिव डॉ. विजय शर्मा उपस्‍थ‍ित होते. फार्माच्‍या या सत्रात एएमटीझेडचे सीईओ डॉ. ज‍ितेंद्र शर्मा, नितिका फार्माचे रवलीन खुराना, झीम लॅबचे डॉ. अनवर दौड, अतुल मंडलेकर, अ‍ॅट्रमचे अमित कुमार शर्मा, आलोक सिंग आदी मान्‍यवरांनी सहभाग नोंदवला.

नागपुरात लॉजिस्‍टीकच्‍या उत्तम सुविधा- नितीन गडकरी :नागपुरात निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उपलब्‍ध झालेल्‍या असून म‍िहान सेझचा देखील उद्योगांना लाभ होऊ शकतो. आता निर्यात करण्‍यासाठी मुंबईला जाण्‍याची गरज नसून लॉजिस्‍टीकच्‍या दृष्‍टीनं सिंदी ड्रायपोर्ट सारख्‍या उ‍त्तम सुविधा येथे उपलब्‍ध आहेत. फार्मा कंपन्‍यांनी याचा लाभ घ्‍यावा, असं आवाहन नितीन गडकरी यांनी केलं. त्‍यांनी एमएडीसी आणि नेदरलँडच्‍या कंपनीचे करारासाठी अभिनंदन केले.

हेही वाचा:

  1. 'बिहारचे योगी' बनले नितीश सरकारमध्ये उपमुख्यमंत्री, जाणून घ्या कोण आहेत सम्राट चौधरी?
  2. नितीश कुमारांनी नवव्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, राजभवनात 'जय श्री राम'च्या घोषणा
  3. अयोध्येत राम, बिहारमध्ये 'पलटूराम'; नितीश कुमारांना राजीनाम्याचा छंद, संजय राऊतांची टीका

ABOUT THE AUTHOR

...view details