ठाणे :एका १९ वर्षीय प्रियकरानं १५ वर्षीय प्रेयसीला लग्नाचं आमिष दाखवून बहाण्यानं स्वतःच्या घरी नेलं. त्यानंतर अल्पवीयन प्रेयसीशी शारीरिक संबंधास तगादा करत असतानाच, पीडित प्रेयसीनं संबंधास नकार दिला. मात्र नकार देवूनही दगाबाज प्रियकरानं प्रेयसीवर बळजबरीनं बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना भिवंडी शहरानजीक असलेल्या एका गावातील इमारतीच्या पाठीमागे घडली. याप्रकरणी अल्पवीयन प्रेयसीच्या फिर्यादीवरून प्रियकरावर नारपोली पोलीस ठाण्यात अत्याचारासह पोक्सोन्वये गुन्हा दाखल करण्यात आला तसंच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
प्रेयसीला लग्नाचं आमिष -पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवीयन पीडित प्रेयसी भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील एका सोसायटीत राहात आहे. तर ती राहत असलेल्या परिसरात दुसऱ्या सोसायटीत दगाबाज प्रियकर राहात आहे. त्यातच एकाच भागात राहात असल्यानं दोघांची ओळख झाली. या ओळखीतून दोघांमध्ये ऑगस्ट २०२४ मध्ये जवळीक निर्माण होऊन प्रेमसंबंध जुळून आले. त्यानंतर प्रेमसंबंधातून आरोपी प्रियकरानं पीडित प्रेयसीला लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक सुखाची मागणी केली. मात्र पीडित प्रेयसीनं त्यास नकार दिला. त्यानंतर पीडित प्रेयसीला आरोपी प्रियकरानं त्याच्या घरी बोलावून प्रेयसीवर इच्छेविरुद्ध जबरीनं बलात्कार केला.