नवी मुंबई : 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत निवड झालेल्या ठाणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांचा समुह नुकताच श्रीराम मंदिर अयोध्या याठिकाणी रवाना झालाय. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातून 121 लाभार्थी ज्येष्ठ नागरिक तीर्थयात्रेसाठी अयोध्येला गेलेत.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना जाहीर झाल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजविकास विभागामार्फत विविध माध्यमांतून या योजनेचा प्रभावी प्रचार करण्यात आला. यादृष्टीनं नमुंमपा मुख्यालयात ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या आणि ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करुन योजनेविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे आठही विभाग कार्यालयांमध्ये योजनेचे अर्ज विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात आले.
महानगरपालिकेकडं 231 ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज संकलित :महानगरपालिकेकडं 231 ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज संकलित झाले. हे अर्ज सहा.आयुक्त, समाजकल्याण विभाग, ठाणे यांच्याकडं पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले. तेथील छाननीअंती 213 अर्ज पात्र ठरले. यामधून अयोध्येतील श्रीराम मंदिर तीर्थ इथं दर्शनासाठी 152 अर्जदारांची निवड झाली. अशा 152 पात्र लाभार्थ्यांपैकी 121 ज्येष्ठ नागरिक लाभार्थी अयोध्येकडं रवाना झालेत.
'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत' नवी मुंबईतील 121 ज्येष्ठ नागरिकांना अयोध्येला रवाना - Chief Minister Tirth Darshan Yojana - CHIEF MINISTER TIRTH DARSHAN YOJANA
'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने'च्या अंतर्गत नवी मुंबईतील 121 ज्येष्ठ नागरिक तीर्थ दर्शनासाठी अयोध्येतील श्रीराम मंदिराकडं रवाना झाले आहेत.
Published : Oct 7, 2024, 9:40 AM IST
डॉक्टरांसह 3 वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे पथक : प्रत्येक बससोबत समाजविकास विभागानं समन्वयकाची नियुक्ती केली आहे. या बसेसमधून नवी मुंबईतील 121 लाभार्थी ज्येष्ठ नागरिक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे गेले. तिथून पुढं ठाणे जिल्ह्यातील निवड झालेल्या लाभार्थ्यांसमवेत रेल्वेनं अयोध्येकडं तीर्थयात्रेला निघाले. या यात्रेकरुंसमवेत जिल्हा समाज कार्यालयांमार्फत नियुक्त 13 स्वयंसेवक असणार आहे. लाभार्थ्यांचे वय 60 वर्ष आणि त्यापुढील असल्यानं नमुंमपाचे डॉक्टरांसह 3 वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे पथकही त्यांच्यासोबत अयोध्येला रवाना झाले आहेत.
हेही वाचा -