महाराष्ट्र

maharashtra

राज्यातील वाईन उद्योगाला शंभर कोटींचा व्हॅट परतावा - Wine Industry

Wine Industry : एकीकडं राज्यात लोकसभा निवडणुकांची (lok Sabha Elections) रणधुमाळी सुरू असताना राज्यातील नाशिक आणि सोलापूर येथील वाईन उद्योगाला चालना देण्यासाठी राज्य सरकारनं शंभर कोटी रुपयांचा व्हॅट परतावा दिला आहे. यामध्ये नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 12 वाईन (Wine) उद्योगांचा समावेश असल्याची माहिती, उद्योग विभागाच्या अवर सचिव सुनिता हजारी यांनी शासन निर्णयाद्वारे दिली आहे.

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 28, 2024, 9:34 PM IST

Published : Mar 28, 2024, 9:34 PM IST

Wine Industry
वाईन उद्योग

मुंबई Wine Industry:राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये, शेतकऱ्यांना द्राक्ष लागवडीस (Grapes Farming) प्रोत्साहन मिळावं, तसेच सुकामेवा बनवणं, द्राक्षापासून आर्थिकदृष्ट्या अधिक लाभदायी पर्यायी उत्पादनाची निर्मिती व्हावी, यासाठी राज्य सरकारनं द्राक्षावर आधारित वाईन उद्योगास प्रोत्साहन म्हणून द्राक्ष प्रक्रिया उद्योग धोरण राबविलं आहे. सदर धोरणाच्या अंमलबजावणीचा भाग म्हणून राज्यात उत्पादित झालेल्या आणि अंतिमतः विक्री झालेल्या वाईनच्या विक्रीवर (Wine) असलेले 20 टक्के मूल्यवर्धित कर भरल्यास त्यापैकी 16 टक्के कराच्या रक्कमे इतके वाईन प्रोत्साहन अनुदान वाईन उद्योगास देण्याबाबत योजना शासनानं अंमलात आणली आहे.



व्हॅट परतावा योजना : वाईन उत्पादक घटकास प्रोत्साहन योजने अंतर्गत व्हॅट परताव्याचे प्रलंबित दावे निकाली काढणे आणि सदर योजनेची अंमलबजावणी पुढे सुरू ठेवण्याबाबत सरकारनं निर्णय घेतला आहे. त्यानुसार गेल्या तीन वर्षात एकूण 96 कोटी 36 लाख रुपये रक्कमेतून 15 कोटी वजा केले. 81 कोटी 36 लाख रुपये रक्कमेचे 12 दावे प्रलंबित आहेत. त्यापूर्वीच्या कालावधीचे दोन कोटी दहा लाख रुपयांचे प्रलंबित 15 दावे आणि 57 कोटी सहा लाख रुपये यांचे 15 दावे, असं एकूण 140 कोटी 53 लाख रक्कमेचे दावे प्रलंबित होते. उद्योग विभागानं केलेल्या विनंती नुसार वाईन उद्योगात प्रोत्साहन योजने अंतर्गत उर्वरित प्रलंबित दावे निकाली काढण्याकरिता निर्णय घेण्यात आला. त्याला वित्त विभागानं पुनर्विनियोजन करण्यास मान्यता दिली. त्यानुसार राज्यातील वाईन उद्योगांना 16 कोटी रुपये वॅट परतावा पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध करून देण्यात आला आहे.



कोणत्या उद्योगांना मिळाला परतावा? :राज्यातील नाशिक जिल्ह्यातील प्रामुख्याने गुड ड्रॉप वाइन्स, मोईत हेनसी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सुला वाईन यार्ड प्रायव्हेट लिमिटेड, सुला विनीयार्ड प्रायव्हेट लिमिटेड, वेलोनी विनीयार्ड प्रायव्हेट लिमिटेड, व्हीनस सेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, यॉर्क वायनरी प्रायव्हेट लिमिटेड, आर्टिसन स्पिरीट प्रायव्हेट लिमिटेड या वाईन उद्योगांना प्रामुख्यानं लाभ मिळाल्याची माहिती, उद्योग विभागाच्या अवर सचिव सुनिता हजारी यांनी शासन निर्णयाद्वारे दिली आहे.

हेही वाचा -

  1. अडसूळ, कडू यांचा विरोध असतानाही भाजपाकडून नवनीत राणांचं तोंड गोड - Amravati Constituency War
  2. 'हट्ट कुणाचाही असो, हक्क तुमचाच'; साताऱ्याच्या उमेदवारीसाठी अजित पवार यांना कार्यकर्त्यांचा आग्रह - Ajit Pawar Group
  3. दिलीप वळसे पाटील यांचा अपघात, रुग्णालयात उपचार सुरु, नेमकं काय घडलं? - Dilip Walse Patil Accident

ABOUT THE AUTHOR

...view details