मुंबई Mumbai Lok Sabha Election 2024 :देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आली आहे. आतापर्यंत निवडणुकीचे तीन टप्पे पूर्ण झाले आहेत. महाराष्ट्रातील लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी २४ जागांवर मतदान पूर्ण झाले आहे. उर्वरित २४ जागांपैकी चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी ११ जागांवर आणि अंतिम पाचव्या टप्प्यात २० मे रोजी १३ जागांवर मतदान होणार आहे. विशेष म्हणजे, अंतिम टप्प्यात मतदान होणाऱ्या १३ जागांमध्ये महा मुंबईतील १० जागांचा समावेश आहे. यामध्ये मुंबईतील मुंबई उत्तर, मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर पश्चिम या ६ जागांसोबत ठाणे, कल्याण, भिवंडी व पालघर या जागांचा समावेश आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना 'न भूतो... ' दुभंगली. एकनाथ शिंदे यांना 'शिवसेना' हे नाव आणि 'धनुष्य बाण' मिळणार, यावर शिक्कामोर्तब झालं. तर उद्धव ठाकरे यांना शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नव्या नावानिशी मतदारांना सामोरं जावं लागणार आहे. खरी शिवसेनाल कुणाची? या प्रश्नाचं उत्तर राज्यातले मतदार ठरवणार आहे. ४ जून रोजी, मतमोजणीच्या दिवशी हे मतदार 'त्यांच्या मनातली शिवसेना' निश्चित करणार आहेत.
पालघरमध्ये डॉ. हेमंत सावरा यांना उमेदवारी :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारे निवडणुकीच्या रिंगणात हॅटट्रिक करण्याच्या इराद्याने उतरले आहेत. त्यांच्यासमोर एकनाथ शिंदे यांनी नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली आहे. पालघरमध्ये एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खासदार डॉ. राजेंद्र गावित यांचा पत्ता कट करण्यास भाजपाला यश आलं. तिथून भाजपाकडून डॉ. हेमंत सावरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपा, शिवसेना (तेव्हाची अविभाजीत), शिवसेना (एकनाथ शिंदे) असा प्रवास करत राजेंद्र गावित पुन्हा भाजपात प्रवेश करत स्वतःचं राजकीय वर्तुळ पूर्ण केलं आहे. पालघरची लढाई अटीतटीची होणार आहे. कारण पालघर मधून उद्धव ठाकरे यांनी भारती कामडी यांना उमेदवारी दिली असून बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पालघर लोकसभा मतदारसंघातून बोईसरचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. भिवंडीमध्ये भाजपाने विद्यमान खासदार कपिल पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिली असून ते सुद्धा हॅटट्रिक करण्याच्या उर्मीत तयारी करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)कडून सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यासमोर उद्धव ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांचं तुलनेनं सोपं आव्हान आहे.
मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघात अशा आहेत लढती :