बुलावायो ZIM vs PAK 2nd T20I Live Streaming : झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसरा T20 सामना आज मंगळवार, 3 डिसेंबर रोजी होणार आहे. उभय संघांमधील हा सामना बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब इथं होणार आहे. या मालिकेत सिकंदर रझा झिम्बाब्वेचं नेतृत्व करत आहे. तर पाकिस्तानची कमान सलमान आगाच्या हातात आहे.
पहिल्या T20 सामन्यात पाकिस्तानचा विजय :मालिकेतील पहिल्या T20 सामन्यात पाकिस्ताननं झिम्बाब्वेचा 57 धावांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं 4 गडी गमावून 165 धावा केल्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ 108 धावांवर गारद झाला. यासह पाकिस्ताननं तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेच्या नजरा मालिकेत पुनरागमनाकडे असतील. तर दुसरा सामना जिंकून पाकिस्तानला मालिका जिंकायची आहे. परणामी दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
मालिकेत बरोबरी करण्याच्या इराद्यानं यजमान संघ मैदानात : दुसऱ्या टी-20 सामन्यात पाकिस्तान संघाला आपल्या वेगवान गोलंदाजांवर पूर्ण विश्वास आहे, तर झिम्बाब्वेला आपल्या घरच्या मैदानावर विजयाची आशा आहे. घरच्या मैदानावर खेळणारा झिम्बाब्वे संघ मालिकेत बरोबरी करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरणार आहे. अनुभवी सिकंदर रझा संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. सिकंदर रझा बॅट आणि बॉल दोन्हीनं चमत्कार करु शकतो. ब्रायन बेनेट, तदिवनाशे मारुमणी, डिऑन मायर्स, रायन बर्ल हे खेळाडू फलंदाजीत महत्त्वाच्या भूमिका बजावतील.
दोन्ही संघाचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय :झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 19 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या काळात पाकिस्तान संघाचं पारडं जड आहे. पाकिस्तान संघानं 17 सामने जिंकले आहेत. तर झिम्बाब्वेला केवळ दोनच सामने जिंकता आले आहेत.
T20 मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला T20 सामना, 01 डिसेंबर, पाकिस्तान 57 धावांनी विजयी
- दुसरा T20 सामना, आज, दुपारी 5 वाजता क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
- तिसरा T20 सामना, 05 डिसेंबर, दुपारी 5 वाजता क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
खेळपट्टी कशी असेल :झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा T20 सामना बुलावायो इथं होणार आहे. क्वीन्स स्पोर्ट्स क्लबच्या खेळपट्टीवर पहिल्या डावाची सरासरी 154 धावा आहे. या खेळपट्टीवर फलंदाजांना खूप मदत मिळते, परंतु वेगवान गोलंदाजांना नवीन चेंडूनं बाऊन्स आणि स्विंग मिळू शकते. या मैदानावर दुसऱ्या डावात खेळपट्टी संथ होते, ज्यामुळं फिरकीपटूंना मदत होते. या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करताना 10 पैकी 9 सामने जिंकले आहेत. नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने प्रथम फलंदाजी करावी जेणेकरून मोठी धावसंख्या फलकावर लावता येईल.
झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यात दुसरा T20 सामना कधी आणि कुठं होणार?