हरारे ZIM vs IRE 1st T20I Live Streaming : झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि आयर्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात तीन सामन्यांची T20 मालिका सुरु होत आहे. यातील पहिला सामना आज 22 फेब्रुवारी 2025 रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे इथं खेळवला जाईल.
पाहुण्या संघाचा पुनरागमनाचा प्रयत्न :या मालिकपुर्वी दोन्ही संघांमध्ये एक कसोटी सामना खेळवण्यात आला होता. ज्यात आयर्लंडनं विजय मिळवला आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवण्यात आली. ज्यात यजमान संघानं जबरदस्त पुनरागमन केलं आणि 2-1 नं मालिका विजय मिळवला. आता दोन्ही संघ T20 मालिकेत एकमेकांसमोर येतील. झिम्बाब्वे संघ मालिकेतील पहिला सामना जिंकून आघाडी मिळवू इच्छितो. तर आयर्लंड संघ T20 मालिकेत पुनरागमन करु इच्छितो. आयर्लंडचा संघ संतुलित आहे.
हरारेची खेळपट्टी कशी असेल : हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर अलिकडेच चांगले सामने खेळले गेले आहेत. या मैदानाची खेळपट्टी चढ-उतार होते. सुरुवातीला, नवीन चेंडूनं वेगवान गोलंदाज घातक ठरले आहेत. पण असे फलंदाज आहेत जे स्थिरावल्यानंतर मोठी खेळी करु शकतात. खेळपट्टी थोडी मंद आहे, ज्यामुळं चेंडू अधिक फिरतो. अशा परिस्थितीत, नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करत विरोधी संघाला कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल.
हेड-टू-हेड रेकॉर्ड कसा :झिम्बाब्वे आणि आयर्लंड संघ T20I मध्ये 15 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यात आयर्लंडचा वरचष्मा दिसतो. आयर्लंडनं 15 पैकी 8 सामने जिंकले आहेत. तर झिम्बाब्वेनं 7 सामने जिंकले आहेत. यावरुन दोन्ही संघांमध्ये तीव्र स्पर्धा असल्याचं दिसून येते. पण झिम्बाब्वेला घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मिळू शकतो.
झिम्बाब्वे विरुद्ध आयर्लंड यांच्यातील पहिला T20I सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?
झिम्बाब्वे विरुद्ध आयर्लंड यांच्यातील पहिला T20I सामना 22 फेब्रुवारी (शनिवार) रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे इथं भारतीय वेळेनुसार सायंकाळी 5:00 वाजता खेळला जाईल. याची नाणेफेक दुपारी 04:30 वाजता होईल.