हरारे ZIM vs AFG 3rd T20I Live Streaming : झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा सामना आज 14 डिसेंबर (शनिवार) रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे इथं खेळवला जाईल. संध्या ही मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. यामुळं तिसरा सामना जिंकणारा संघ T20 मालिका जिंकेल. झिम्बाब्वेनं पहिला सामना चार गडी राखून जिंकला होता, मात्र शुक्रवारी अफगाणिस्तान संघानं शानदार पुनरागमन करत 50 धावांनी विजय मिळवला.
दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तान विजयी :दुसऱ्या T20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर पाहुण्या संघानं 153 धावा केल्या, ज्यात दर्वेश रसूलीनं 42 चेंडूत 58 धावा केल्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वे 17.4 षटकांत सर्वबाद 103 धावांवर आटोपला, अफगाणिस्तानकडून कर्णधार राशिद खान आणि मध्यमगती गोलंदाज नवीन-उल-हकनं प्रत्येकी तीन बळी घेतले. अफगाणिस्तानसाठी आतापर्यंत आठ T20 सामने खेळलेल्या रसूलीला त्याच्या महत्त्वपूर्ण अर्धशतकासाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.
दोन्ही संघाचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय :आंतरराष्ट्रीय T20 मध्ये झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान संघ 17 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यात अफगाणिस्तानचा वरचष्मा दिसत आहे. अफगाणिस्ताननं 17 पैकी 15 T20 सामने जिंकले आहेत. तर झिम्बाब्वेनं फक्त 2 सामने जिंकले आहेत. यावरुन अफगाणिस्तानचा संघ अधिक मजबूत असल्याचं दिसून येतं.
खेळपट्टी कशी असेल : हरारे स्पोर्ट्स क्लबमधील खेळपट्टी फलंदाजीसाठी आव्हानात्मक असेल आणि फिरकीपटूंसाठी खूप उपयुक्त ठरेल. मात्र, सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना नव्या चेंडूची थोडीफार मदत मिळू शकते. पण जसजसा खेळ पुढं जाईल तसतशी फिरकीपटू महत्त्वाची भूमिका बजावतील. या मैदानावर दोन्ही संघ प्रथम फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतील.
हरारे स्पोर्ट्स क्लब येथील T20 सामन्यांची आकडेवारी कशी : मीडिया रिपोर्ट्सनुसार, हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये आतापर्यंत एकूण 48 T20 सामने खेळले गेले आहेत. ज्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं 24 सामने जिंकले आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघानं 22 सामने जिंकले आहेत. याशिवाय एक सामना अनिर्णित तर एक सामना बरोबरीत सुटला आहे.
T20 मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला T20 सामना : 11 डिसेंबर, हरारे (झिम्बाब्वे 4 विकेटनं विजयी)
- दुसरा T20 सामना : 13 डिसेंबर, हरारे (अफगाणिस्तान 50 धावांनी विजयी)
- तिसरा T20 सामना : आज, हरारे
झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा T20 सामना कधी होणार?