बुलावायो ZIM vs AFG 1st Test Live Streaming : झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 26 डिसेंबर (गुरुवार) पासून बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब इथं खेळवला जाईल. झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान त्यांची सध्याची मल्टी फॉरमॅट मालिका सुरु ठेवण्यासाठी सज्ज आहेत. तीन T20 आणि तीन वनडे सामन्यांनंतर आता दोन्ही संघ दोन कसोटी सामन्यांमध्ये आमनेसामने येणार आहेत.
रोमांचक सामना होण्याची अपेक्षा : झिम्बाब्वेनं शेवटचा कसोटी सामना जुलै 2024 मध्ये खेळला होता. संघाचा सामना एकमेव कसोटीत आयर्लंडशी झाला. या सामन्यात दोन्हीकडून जोरदार ॲक्शन आणि रोमांचक खेळ पाहायला मिळाला. मात्र, आयर्लंडनं हा सामना चार गडी राखून जिंकला. दुसरीकडे, अफगाणिस्तान सप्टेंबर 2024 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामना खेळणार होता. मात्र, पावसामुळं एकही चेंडू न टाकता सामना रद्द करण्यात आला. लांबलचक फॉर्मेटमध्ये कमी सरावामुळं, दोन्ही बाजूंना आगामी चकमकीत चांगल्या कामगिरीची आशा असेल. विशेष म्हणजे 2013 नंतर झिम्बाब्वेनं घरच्या मैदानावर कसोटी सामना जिंकलेला नाही, त्यामुळं हा सामना जिंकत 11 वर्षांनी घरच्या मैदानावर सामना जिंकण्याचा यजमान संघाचा प्रयत्न असेल.
दोन्ही संघातील हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत दोनदा आमनेसामने आले आहेत. या सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी 1-1 सामना जिंकला आहे. हा समान विक्रम दोन्ही संघांमधील स्पर्धा आणि संतुलित कामगिरी दर्शवतो. आगामी कसोटी मालिकेत कोणता संघ आघाडी घेतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
झिम्बाब्वे विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील पहिला कसोटी सामना कधी आणि कुठं होणार?
झिम्बाब्वे विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील पहिला सामना 26 डिसेंबर (गुरुवार) पासून क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो इथं भारतीय वेळेनुसार दुपारी 01:30 वाजता खेळवला जाईल, तर याची नाणेफेक 01:00 वाजता होईल.