हरारे Squad for Test Match :प्रत्येक संघ कसोटी क्रिकेटला गांभीर्यानं घेतो कारण हा खेळाचा सर्वात जुना आणि प्रतिष्ठित फॉरमॅट आहे. यामुळंच जेव्हा जेव्हा एखादा संघ कसोटी मालिकेसाठी आपला संघ जाहीर करतो तेव्हा तो बलवान आणि अनुभवी खेळाडूंची निवड करण्याचा प्रयत्न करतो. तथापि, असा एक संघ आहे ज्यानं नवीन चेहऱ्यांवर विश्वास व्यक्त केला आहे आणि त्याने केवळ 1-2 नव्हे तर अर्धाडझन अनकॅप्ड खेळाडूंना आपल्या कसोटी संघात समाविष्ट केलं आहे.
झिम्बाब्वेनं जाहीर केला संघ : हा संघ झिम्बाब्वे आहे. ज्यांनी अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. झिम्बाब्वेच्या कसोटी संघात तब्बल सात अनकॅप्ड खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यात फलंदाज बेन कुरन, जोनाथन कॅम्पबेल, यष्टिरक्षक फलंदाज तदिवानाशे मारुमणी, न्याशा मायावो, वेगवान गोलंदाज ट्रेवर ग्वांडू, ताकुडज्वा चटाइरा आणि न्यूमन न्यामाहुरी यांचा समावेश आहे.
28 वर्षांनंतर होणार बॉक्सिंग डे कसोटी :झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 26 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. झिम्बाब्वे क्रिकेटसाठी हा एक महत्त्वाचा प्रसंग असेल कारण यजमान 28 वर्षानंतर त्यांच्या घरच्या मैदानावर पहिली बॉक्सिंग डे कसोटी खेळणार आहेत. 1996 मध्ये हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये झिम्बाब्वेनं इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानात बॉक्सिंग डे कसोटी खेळली होती, जी अनिर्णित राहिली होती. तेव्हापासून झिम्बाब्वेनं परदेशात 2000 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध आणि 2017 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केवळ बॉक्सिंग डे कसोटी खेळली आहे.