महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

युवराज सिंगला भारतरत्न द्यावा, धोनीनं माझ्या मुलाचं...; योगराज सिंग यांचं टीकास्त्र - Yogiraj Singh on MS Dhoni - YOGIRAJ SINGH ON MS DHONI

Yuvraj Singh Deserved Bharat Ratna : योगराज सिंग यांनी पुन्हा एकदा एमएस धोनीवर युवराज सिंगचं करिअर बरबाद केल्याचा आरोप केला. तसंच यासाठी मी त्याला कधीही माफ करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.

Yuvraj Singh Deserved Bharat Ratna
योगराज सिंगची जोरदार टीका (IANS Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Sep 2, 2024, 1:17 PM IST

Updated : Sep 2, 2024, 4:45 PM IST

नवी दिल्ली Yuvraj Singh Deserved Bharat Ratna : क्रिकेट प्रशिक्षक तथा दिग्गज अष्टपैलू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी भारताचा माजी विश्वचषक विजेता कर्णधार एमएस धोनीवर पुन्हा एकदा जोरदार टीका केलीय. योगराज नेहमीच धोनीवर टीका करतात. वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष संघात एकत्र असताना धोनीनं आपल्या मुलाचं जगणं कठीण केल्याचा आरोप योगराज यांनी केला आहे. कॅन्सरवर मात करुन युवराजनं संस्मरणीय पुनरागमन केलं आणि त्याला दुसऱ्यांदा संधीची गरज होती, जी त्याला मिळाली नाही, असं 66 वर्षीय योगराज यांनी सांगितलं. युवराज संघासाठी अधिक योगदान देऊ शकला असता, असंही ते म्हणाले.

धोनीनं माझ्या मुलाचं करिअर उद्ध्वस्त केलं :योगराज सिंग यांनी स्विच यूट्यूब चॅनलला सांगितलं की, "मी एमएस धोनीला माफ करणार नाही. त्यानं स्वतःला आरशात पहावं. तो खूप यशस्वी क्रिकेटर आहे, मी त्याला सलाम करतो, पण त्यानं माझ्या मुलाचं काय केलं. ते चांगलं नाही. आता सर्वकाही बाहेर येत आहे आणि ते कधीही माफ केलं जाऊ शकत नाही. त्या माणसानं माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, जो आणखी चार-पाच वर्षे खेळू शकला असता." तसंच मी सर्वांना आव्हान देतो की युवराजसारखा मुलगा घडवा.

भारतरत्न मिळायला हवा :योगराज सिंग यांनी आपला मुलगा भारतरत्नसाठी पात्र असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, "कॅन्सर असूनही खेळून देशासाठी विश्वचषक जिंकल्याबद्दल त्याला (युवराज) भारतरत्ननं सन्मानित करायला हवं." युवराज आणि धोनीनं भारतासाठी एकत्र 273 सामने खेळले आणि सर्व प्रकारामध्ये अनेक संस्मरणीय भागीदारी केल्या. धोनीच्या नेतृत्वाखाली टी-20 विश्वचषक आणि एकदिवसीय विश्वचषक विजयादरम्यान एकाच वेळी क्रमवारीत वर आलेले हे दोन्ही क्रिकेटपटू मर्यादित षटकांच्या संघाचे प्रमुख चेहरे देखील होते.

दोन विश्वचषक जिंकले : 2007 आणि 2011 मध्ये भारताच्या विश्वचषक विजयात युवराज सिंगनं महत्त्वाची भूमिका बजावली होती. या अष्टपैलू खेळाडूनं 2007 च्या पहिल्या टी 20 विश्वचषकात चमकदार कामगिरी केली होती. ज्यामुळं भारतीय फलंदाजी मधल्या फळीत मजबूत झाली होती. 2011 मध्ये भारताच्या एकदिवसीय विश्वचषक विजयात युवराजला त्याच्या बॅट आणि बॉलसह अष्टपैलू योगदानासाठी टूर्नामेंटचा खेळाडू म्हणून निवडण्यात आलं. त्यानंतर युवराज देशांतर्गत विश्वचषकादरम्यान कॅन्सरशी झुंज देत असल्याचं समोर आलं.

हेही वाचा :

  1. दुसऱ्या कसोटीतही पाकिस्तान पराभवाच्या छायेत; बांगलादेशच्या 'लिटन'समोर प्रतिस्पर्धी गोलंदाज बनले 'दास' - Pak vs Ban 2nd Test
  2. धोनी आणि विराट कोहलीमध्ये मैत्रीचं नातं नाही..? खुद्ध धोनीनंच केलं स्पष्ट, पाहा व्हिडिओ - MS Dhoni and Virat Kohli
Last Updated : Sep 2, 2024, 4:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details