पुणे First Indian to Smashed 30 Sixes in year : भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालनं इतिहास रचला आहे. भारताच्या दुसऱ्या डावात त्यानं न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साऊदीच्या गोलंदाजीवर जबरदस्त षटकार ठोकला. या षटकारासह यशस्वी कसोटीत एका कॅलेंडर वर्षात 30 षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. हा असा विक्रम आहे, जो सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीसारखे दिग्गज फलंदाजही करु शकले नाहीत.
मॅक्क्युलमनंतर अशी कामगिरी करणारा दुसराच फलंदाज : न्यूझीलंडचा स्फोटक फलंदाज ब्रेंडन मॅक्क्युलमनंतर हा विक्रम करणारा यशस्वी हा जगातील फक्त दुसरा फलंदाज ठरला आहे. यशस्वीचा हा विक्रम गाठण्याचा प्रवास केवळ पॉवर हिटिंगपुरता मर्यादित नव्हता. गरज असेल तेव्हा त्यानं संघासाठी संथ खेळीही खेळली आणि क्रीजवर टिकून राहण्याचं धाडस दाखवलं. भारताच्या दुसऱ्या डावात लंच ब्रेकपर्यंत यशस्वी 46 धावांवर नाबाद आहे. भारतीय संघाला 2012 नंतर घरच्या मैदानावर पहिली कसोटी मालिका गमावण्याचा पेच टाळायचा असेल, तर जैस्वालला या कसोटीत मोठी खेळी खेळावी लागेल.