महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

विनेश फोगटप्रमाणेच अमन सेहरावतचंही वाढलं होतं वजन, 10 तासांत 4.6 किलो वजन कमी करत रचला इतिहास; कसा घडला 'चमत्कार'? - Paris Olympics 2024 - PARIS OLYMPICS 2024

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा कुस्तीपटू अमन सेहरावतनं कांस्यपदक जिंकण्याचा पराक्रम केला. हरियाणाच्या या कुस्तीपटूनं आपल्या पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदक जिंकलं होतं. पण आता त्याच्या विजयानंतर मोठा खुलासा झाला आहे की कांस्यपदकाच्या सामन्यापूर्वी त्याचं वजनही 4.5 किलोनं वाढलं होतं. जाणून घ्या या कुस्तीपटूचं वजन कसं कमी झालं.

Paris Olympics 2024
अमन सेहरावत (IANS Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 10, 2024, 12:32 PM IST

Updated : Aug 10, 2024, 12:45 PM IST

पॅरिस Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 21 वर्षीय भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावतनं शुक्रवारी रात्री इतिहास रचला. अमननं 57 किलो गटात कांस्यपदक जिंकून देशाला आणखी एक पदक मिळवून दिलं. या सामन्यात अमननं कांस्यपदकाच्या लढतीत पोर्तो रिकोच्या कुस्तीपटूचा 13-5 असा एकतर्फी पराभव केला. अमनच्या विजयानंतर एक मोठा खुलासा समोर आला आहे. अमन सेहरावतचं वजनही विनेश फोगटप्रमाणं खूप वाढलं होतं. अमन सेहरावत जेव्हा उपांत्य फेरीत हरला, तेव्हा त्याचं वजन 4.5 किलोनं वाढलं होतं. पण या भारतीय कुस्तीपटूनं आणि त्याच्या सपोर्ट स्टाफनं मिळून कांस्यपदकाच्या सामन्यापूर्वी ते कमी केलं. (wrestling at the summer olympics – freestyle 57 kg medals)

अमन सेहरावतनं 10 तासात 4.5 किलो वजन केलं कमी : जपानच्या कुस्तीपटूकडून उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर अमनचं वजन मोजण्यात आलं. तेव्हा ते 61.5 किलो होतं. अमन 57 किलो गटात खेळतो आणि हे वजन त्याच्या श्रेणीपेक्षा 4.5 किलो जास्त होतं. यानंतर भारतीय प्रशिक्षक जगमंदर सिंग आणि वीरेंद्र दहिया यांनी एकूण 6 सदस्यीय कुस्ती संघासह अमन सेहरावतचं वजन कमी करण्याचं मिशन पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. मोठी गोष्ट म्हणजे त्यांच्याकडं फक्त 10 तास उरले होते.

कसं केलं वजन कमी :

  • अमन सेहरावतला प्रथम दीड तासाचं मॅट सत्र देण्यात आलं, ज्यात त्याला उभं असताना कुस्ती खेळायला लावली.
  • यानंतर अमन सेहरावतला एक तासाचं हॉट बाथ सेशन देण्यात आलं.
  • रात्री 12 वाजल्यानंतर अमन सेहरावतनं जिममध्ये तासभर ट्रेडमिल रनिंग केली.
  • अमनला विश्रांतीसाठी 30 मिनिटं देण्यात आली आणि त्यानंतर त्याला प्रत्येकी 5 मिनिटं सौना बाथची 5 सत्रं देण्यात आली, त्यामुळं त्यानं 3.6 किलो वजन कमी केलं.
  • अमनला मसाज देण्यात आला आणि यानंतर खेळाडूनं हलके जॉगिंग आणि 15 मिनिटांचं धावण्याचं सत्र केलं.
  • एवढ्या मेहनतीनंतर पहाटे 04:30 पर्यंत अमनचं वजन 56.9 किलो झाले जे मर्यादेपेक्षा 100 ग्रॅम कमी होतं.

विनेशला ठरवलं अपात्र : अमन सेहरावतचं 10 तासात 4.5 किलो वजन कमी करणं ही मोठी गोष्ट आहे. कारण, भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगट जास्त वजनामुळं अपात्र ठरली होती. विनेशनं 50 किलो गटातील स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवलं होतं. परंतु, अंतिम फेरीपूर्वी तिचं वजन निर्धारित मर्यादेपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचं आढळून आलं आणि परिणामी तिला अपात्र घोषित करण्यात आलं. सध्या विनेशची केस सीएएसमध्ये सुरु असून, त्यावर लवकरच निर्णय येऊ शकतो.

हेही वाचा :

  1. पॅरिसमध्ये 21 वर्षीय अमननं रचला इतिहास! अखेर भारताला कुस्तीत पदक मिळालं - Paris 2024 Olympics
  2. कुस्तीपटू विनेश फोगटला मिळेल रौप्यपदक? कधी येणार निर्णय, समोर आली मोठी अपडेट - Paris Olympics 2024
Last Updated : Aug 10, 2024, 12:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details