महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Boxing Day कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात - BOXING DAY TEST

बॉक्सिंग-डे टेस्ट मॅचच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघ खेळण्यासाठी मैदानात आली तेव्हा सर्व खेळाडूंनी हातावर काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या.

Team India Wearing Black Belt
बॉक्सिंग-डे टेस्ट (AP Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Dec 27, 2024, 9:49 AM IST

मेलबर्न Team India Wearing Black Belt : मेलबर्नच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 च्या चौथ्या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात होताच, भारतीय संघाचे सर्व खेळाडू काळ्या पट्ट्या बांधून मैदानावर खेळायला आले. खरं तर, 26 डिसेंबरच्या रात्री भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं. महान अर्थतज्ज्ञ आणि देशाचे दोन वेळा पंतप्रधान राहिलेले मनमोहन सिंग यांच्या निधनामुळं संपूर्ण देश शोकसागरात बुडाला असून, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारतीय संघानं सामन्याच्या सुरुवातीला काळी पट्टी बांधली होती.

मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल क्रीडा जगतानंही वाहिली त्यांना श्रद्धांजली : मनमोहन सिंग हे महान अर्थतज्ञ होते. 2004 ते 2014 पर्यंत ते देशाचे पंतप्रधान होते. त्याच्या निधनानंतर भारतीय संघ काळी पट्टी बांधून मैदानावर खेळण्यासाठी आली होती, त्याचवेळी क्रीडा जगतातील इतर अनेक माजी खेळाडूंनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे, ज्यात वीरेंद्र सेहवाग, हरभजन आणि युवराज सिंग यांच्या नावाचा समावेश आहे.

मनमोहन सिंग यांची कारकिर्द कशी : डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पंजाबमध्ये झाला होता. त्यांनी 1952 आणि 1954 मध्ये पंजाब विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी आणि पदव्युत्तर पदवी घेतली. यानंतर त्यांनी 1957 मध्ये केंब्रिज विद्यापीठातून इकॉनॉमिक ट्रायपोस पूर्ण केलं. 1962 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डी.फिल. ची पदवी प्राप्त केली होती. डॉ. मनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्येही अध्यापन केलं. ते 1971 मध्ये भारत सरकारमध्ये वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून रुजू झाले. 1972 मध्ये वित्त मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार बनले. 1987-1990 पर्यंत जिनिव्हा येथील दक्षिण आयोगाचे सरचिटणीस म्हणून त्यांची नियुक्ती झाली. डॉ.मनमोहन सिंग यांनी 2004 ते 2014 या काळात भारताचं पंतप्रधानपद भूषवलं होतं.

हेही वाचा :

  1. भारतीय संघ कॅरेबियन संघाविरुद्ध क्लीन स्वीपची हॅट्ट्रीक करणार? शेवटची मॅच 'इथं' पाहा लाईव्ह
  2. Boxing Day कसोटीचा पहिला दिवसाचा खेळ संपताच विराट कोहलीला धक्का; ICC नं ठोठावला दंड

ABOUT THE AUTHOR

...view details