कॅनबेरा Name of Rohit Sharma Son : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माची गणना भारताच्या महान खेळाडूंमध्ये केली जाते. त्यानं भारतीय संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. त्याच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघानं 2024 चा T20 विश्वचषक जिंकला होता. यानंतर त्यानं आतरराष्टरीय T20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. कसोटी आणि वनडेमध्ये तो भारतीय संघाचा कर्णधार आहे. त्यानं 2015 मध्ये रितिका सजदेहसोबत लग्न केलं. यानंतर 2018 मध्ये त्यांची मुलगी समायरा हिचा जन्म झाला. 15 नोव्हेंबर 2024 रोजी रोहितच्या घरी पुन्हा एकदा आनंद आला आणि त्याच्या पत्नीनं मुलाला जन्म दिला.
रितिका सजदेहनं सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट : रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहनं एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे, ज्यात तिचा ख्रिसमसच्या थीमवर चार आकृत्यांचा फोटो आहे. यात रोहितसाठी 'रो', हृतिक सजदेहसाठी 'रिट्स', मुलगी समायरासाठी 'सॅमी' आणि नवजात मुलासाठी 'अहान' लिहिलं आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव सांगितले आहे. रितिकानं फोटोमध्ये ख्रिसमसचा हॅशटॅगही टाकला आहे. अहान नावाचे अनेक अर्थ आहेत. जसे सुप्रभात, मॉर्निंग ग्लोरी, प्रकाशाचा पहिला किरण इत्यादी.
न्यूझीलंडविरुद्ध सुमार कामगिरी : मुलाच्या जन्मामुळं रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा भाग होऊ शकला नाही. मात्र आता तो ऑस्ट्रेलियात पोहोचला असून दुसऱ्या कसोटीत तो खेळणार आहे. कॅनबेरा येथील मनुका ओव्हल इथं पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध सुरु असलेल्या गुलाबी चेंडूच्या सराव सामन्यात तो संघाची धुरा सांभाळत आहे. गेल्या काही काळापासून रोहितला त्याच्या नावाप्रमाणे कामगिरी करता आली नाही. त्यानं न्यूझीलंडविरुद्ध सहा डावात 15.16 च्या माफक सरासरीनं केवळ 91 धावा केल्या.
रितिका सचदेह सोशल माडिया पोस्ट (ritika sajdeh instagram) कसोटी क्रिकेटमध्ये झळकावली 12 शतकं : ऑस्ट्रेलियाविरुद्धचे उर्वरित कसोटी सामने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. अशा परिस्थितीत रोहित शर्मासाठी ऑस्ट्रेलियात फलंदाजी करणं खूप महत्त्वाचं आहे. आतापर्यंत त्याने भारतासाठी 63 कसोटी सामन्यांमध्ये 6241 धावा केल्या आहेत ज्यात 12 शतकांचा समावेश आहे.
हेही वाचा :
- 34 ओव्हर गोलंदाजी करत घेतल्या सर्व 10 विकेट्स... युवा खेळाडूनं रचला इतिहास
- भारत-ऑस्ट्रेलिया 'पिंक बॉल' कसोटीपूर्वी दिग्गज खेळाडूचं निधन; क्रिकेट विश्वात शोककळा