सेंट किट्स WI vs BAN 1st ODI Live Streaming :वेस्ट इंडिज राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच 8 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. उभय संघांमधला हा सामना वॉर्नर पार्क, बसेटेरे, सेंट किट्स इथं संध्याकाळी 7 वाजल्यापासून खेळवला जाईल. या मालिकेत वेस्ट इंडिजची कमान शाई होपच्या हाती आहे. तर बांगलादेशचं नेतृत्व मेहदी हसन मीराझ करत आहे.
करेबियन संघाला घरच्या मैदानाचा फायदा :पुढील वर्षी होणाऱ्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या तयारीत व्यस्त असलेल्या बांगलादेशसाठी हा सामना विशेष महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडिज संघाला घरच्या मैदानाचा फायदा आहे. या मालिकेत बांगलादेशला पराभूत करण्यासाठी वेस्ट इंडिज पूर्णपणे सज्ज आहे. अलीकडेच वेस्ट इंडिजनं इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत चमकदार कामगिरी केली होती, ज्यात 2-1 असा विजय मिळवला होता. आता वेस्ट इंडिजच्या नजरा बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेवर आहेत. कर्णधार शाई होपच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजचा संघ आपल्या उत्कृष्ट फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर बांगलादेशला खडतर आव्हान देण्यासाठी सज्ज आहे.
वेस्ट इंडिज संघात आक्रमक फलंदाजांचा भरणा : ब्रँडन किंग, एविन लुईस आणि केसी कार्टीसारखे खेळाडू वेस्ट इंडिजच्या फलंदाजीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, तर शेरफेन रदरफोर्ड आणि शिमरॉन हेटमायर हेही मोठ्या फटक्यांसाठी प्रसिद्ध आहेत. गोलंदाजीत, अल्झारी जोसेफ आणि गुडाकेश जाड वेगवान गोलंदाजीत यश मिळवू शकतात, तर फिरकी विभागात रोस्टन चेस हा एक चांगला पर्याय आहे. यापुर्वी वेस्ट इंडिज संघानं 2014 मध्ये बांगलादेशविरुद्ध वनडे मालिका जिंकली होती. आता त्यांना 10 वर्षांनंतर घरच्या मैदानावर मालिका जिंकण्याची संधी असेल.
कसोटीतील पराभवानंतर बांगलादेश करणार पुनरागमन :अलीकडेच बांगलादेशनं अफगाणिस्तानविरुद्धची मालिका 2-1 नं गमावली आहे. आता वेस्ट इंडिजविरुद्ध दमदार पुनरागमन करण्यासाठी बांगलादेश सज्ज झाला आहे. कर्णधार मेहंदी हसन मिराजनं गेल्या काही मालिकांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. मुस्तफिझूर रहमान आणि शरीफुल इस्लाम सारख्या गोलंदाजांना अनुभव आहे. फलंदाजीत महमुदुल्लाह आणि तौहीद हृदोय यांच्याकडून खूप अपेक्षा असतील. याशिवाय जाकर अली यष्टिरक्षक म्हणूनही महत्त्वाचं योगदान देऊ शकतो.
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय :वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत एकूण 44 वनडे सामने खेळले गेले आहेत. यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा झाली. दोन्ही संघांनी 21-21 वनडे सामने जिंकले आहेत. तर दोन सामन्यांचा निकाल लागलेला नाही.
वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिला वनडे सामना कधी खेळला जाईल?