इस्लामाबाद West Indies Arrives in Pakistan : पाकिस्तानचा क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. जिथं ते दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळत आहेत. दरम्यान, एक संघ पाकिस्तानात पोहोचला आहे. हा संघ बऱ्याच दिवसांनी पाकिस्तानात दाखल झाला आहे. हा संघ दुसरा कोणी नसून वेस्ट इंडिजचा कसोटी संघ आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट संघ तब्बल 18 वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये पहिल्या कसोटी मालिकेसाठी सोमवारी इस्लामाबादला पोहोचला. यापूर्वी वेस्ट इंडिजनं 2006 मध्ये कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानचा दौरा केला होता, मात्र त्यानंतर त्यांनी दोनदा पाकिस्तानचा दौरा केला होता, मात्र दोन्ही वेळा वनडे आणि T20 मालिका झाल्या आहेत. हा दौरा वेस्ट इंडिजसाठी महत्त्वाचा आहे, कारण ते पाकिस्तानमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहेत.
कधी होणार पहिला सामना : या दौऱ्यात वेस्ट इंडिज संघ पाकिस्तान शाहीन (पाकिस्तानचा अ संघ) विरुद्ध तीन दिवसीय सराव सामना खेळणार आहे, जो 10 जानेवारीपासून इस्लामाबादमध्ये सुरु होईल. यानंतर या मालिकेतील पहिला कसोटी सामना 17 जानेवारीपासून मुलतानमध्ये खेळवला जाणार आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी 25 जानेवारीपासून मुलतान इथं होणार आहे.
दोन्ही संघांचा WTC मध्ये शेवटचं स्थान टाळायचा प्रयत्न : ही कसोटी मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सध्याच्या चक्राचा भाग आहे, परंतु या सामन्याचा अंतिम चित्रावर कोणताही परिणाम होणार नाही. दोन्ही संघ WTC गुणतालिकेत तळाच्या स्थानावर आहेत. ही मालिका त्यांची स्थिती सुधारण्याची शेवटची संधी असेल. WTC 2023-25 सायकल या वर्षी संपणार आहे, त्यामुळं दोन्ही संघांना गुण मिळवण्याची ही शेवटची संधी असेल. ही मालिका दोन्ही देशांच्या क्रिकेटसाठी एक ऐतिहासिक प्रसंग आहे आणि वेस्ट इंडिजचे पाकिस्तानमधील कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणारी आहे. दोन्ही संघांमधला सामना विशेष असेल कारण ते त्यांच्या खेळात सुधारणा करण्याचा आणि आगामी WTC सायकलसाठी आवश्यक असलेले गुण गोळा करतील.
मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघ : क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), ॲलेक अथेनेस, केसी कार्टी, जोशुआ दा सिल्वा, जस्टिन ग्रीव्हज, कावीम हॉज, टेविन इम्लाच, आमिर जंगू, मिकाईल लुईस, गुडाकेश मोती, अँडरसन फिलिप, केमार रोच, जयडेन सील्स, केविन सील्स, जोमेल वॅरिकन.
हेही वाचा :
- टीम इंडिया आता सहा महिन्यांनतर खेळणार पुढची मॅच; वाचा वेळापत्रक
- फॉलो-ऑननंतर शेजारीही भारताप्रमाणे ऐतिहासिक विजय मिळवणार? निर्णायक मॅच 'इथं' पाहा लाईव्ह