कानपूर Weather Forecast For IND vs BAN 2nd Test : भारतीय क्रिकेट संघ मायदेशात बांगलादेशविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. पहिला सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नईतील चेपॉक स्टेडियम इथं झाला, ज्यात भारतीय संघानं 280 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता भारतीय संघ आणि बांगलादेश यांच्यातील मालिकेतील दुसरी आणि शेवटची कसोटी 27 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये खेळवली जाणार आहे. पण या कसोटीपूर्वी भारतीय चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी येत आहे. जी हवामानाबद्दल आहे. वास्तविक, या कसोटी सामन्यादरम्यान मुसळधार पाऊस पडू शकतो, असं झालं तर सामन्याचा निकाल लावणं कठीण होईल. हा प्रश्न चाहत्यांच्या मनात नक्कीच असेल की कसोटी सामन्यादरम्यान पाचही दिवस पावसाची शक्यता आहे का? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया.
27 सप्टेंबर रोजी कानपूरमधील हवामान कसं असेल : Accuweather या वेबसाईट नुसार, 27 सप्टेंबर रोजी कानपूरमध्ये पावसाची शक्यता 92 टक्क्यांपर्यंत असेल. या दिवशी कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. पूर्णपणे ढगाळ होण्याची शक्यता 99 टक्के आहे. तर वाऱ्याचा वेग 32 किमी/ताशी असेल. तसंच कानपूर कसोटीच्या पहिल्या 3 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पहिल्या तीन दिवशी जास्त पावसाची शक्यता : Accuweather नुसार, दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या 3 दिवसांत जास्तीत जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. पहिल्या दिवशी 92 टक्के, दुसऱ्या दिवशी 80 टक्के आणि तिसऱ्या दिवशी 59 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटच्या दोन दिवसात फक्त 3 आणि 1 टक्के पावसाची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पहिल्या दिवशी सामना सुरु करणं डोकेदुखी ठरु शकते.
कानपूरमध्ये 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत पाऊस कसा असेल :
- 27 सप्टेंबर : 92 टक्के
- 28 सप्टेंबर : 80 टक्के
- 29 सप्टेंबर : 56 टक्के
- 30 सप्टेंबर : 3 टक्के
- 1 ऑक्टोबर : 1 टक्का