पुणे Washington Sundar 10 Wickets Haul : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघ बॅकफूटवर असेल, पण या सामन्यात भारतीय संघाला काही संधी असेल, तर त्याचं सर्व श्रेय वॉशिंग्टन सुंदरला द्यायला हवं. न्यूझीलंडच्या पहिल्या डावात 7 विकेट्स घेतल्यानंतर दुसऱ्या डावातही त्यानं आपल्या अप्रतिम फिरकीचं दर्शन घडवलं आणि आणखी चार बळी घेतले. अशाप्रकारे त्याला सामन्यात आतापर्यंत 11 विकेट घेण्यात यश आलं. यासह तो भारतातील अशा निवडक खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे, ज्यांनी न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत ही कामगिरी केली आहे.
अश्विननं न्यूझीलंडविरुद्ध तीन वेळा, अनिल कुंबळे आणि सुंदरनं एकदा घेतले 10 बळी :न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत सर्वाधिक वेळा 10 बळी घेणारा भारतीय गोलंदाज रविचंद्रन अश्विन आहे, जो या सामन्यातही खेळताना दिसत आहे. या संघाविरुद्धच्या तीन वेळा 10 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय अनिल कुंबळेसह इरापल्ली प्रसन्ना आणि एस वेंकटराघवन यांनीही न्यूझीलंडविरुद्ध प्रत्येकी 10 बळी घेतले आहेत. त्यात आता वॉशिंग्टन सुंदर या नव्या नावाची भर पडली आहे. विशेष म्हणजे वॉशिंग्टन सुंदर हा केवळ चौथा कसोटी सामना खेळत असून यामध्ये त्यानं ही कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे या सामन्याच्या पहिल्या डावात सुंदरनं 5 विकेट घेतल्या होत्या, त्यानं पहिल्यांदाच हे काम केलं होतं.