नागपूर MUM vs VID Ranji Semifinal : नागपुरच्या जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर विदर्भ विरुद्ध मुंबई क्रिकेट संघामध्ये रणजी ट्रॉफीचा उपांत्य (सेमीफायनल) सामना खेळण्यात येत आहे. या सामन्यात 405 धावांची आघाडी घेत विदर्भानं या सामन्यावर पकड आणखी घट्ट केली. चौथ्या दिवसाचा खेळ संपला असता विदर्भाकडे अजून 323 धावांची भक्कम आघाडी आहे. त्यामुळं मुंबईचा प्रवास आणखी कठीण झाला आहे. कारण मुंबईच्या दुसऱ्या डावाची सुरुवात फारसी चांगली झाली नाही. मुंबईनं 83 धावांवर तीन गडी गमावले आहेत.
चौथा दिवस विदर्भाच्या नावावर : या सामन्याचा चौथा दिवस विदर्भाच्या फलंदाजांनी गाजवला. विदर्भच्या संघा आज चौथ्या दिवशी 147 धावांचा पुढं खेण्यास सुरुवात केली. विदर्भाच्या संघाचा कर्णधार अक्षय वाडकर 52 धावा काढत बाद झाला. मात्र,दुसऱ्या बाजूला यश राठोडचा झुंजार खेळ सुरुचं होता. यश राठोडनं 152 धावांची दमदार खेळी करत संघाची धावसंख्या 292 पर्यत नेली. त्याच्या आधारे विदर्भाच्या संघाला 405 धावांची मिळालेली. परिणामी विजयासाठी मुंबईला 406 धावांचं लक्ष्य मिळालं. याला प्रत्युत्तर देताना मुंबई संघानं अवघ्या 83 धावांवर तीन विकेट्स गमावल्या आहेत. त्यामुळं उर्वरित 323 धावांचं लक्ष्य गाठणं मुंबईसाठी अवघड दिसू लागलं आहे.