न्यूयॉर्क T20 World Cup IND vs PAK :टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय क्रिकेट संघानं पाकिस्तान संघावर थरारक विजय मिळवत टी20 विश्वचषकात आपले इरादे स्पष्ट केले. पावसाच्या व्यत्ययामुळे भारत पाकिस्तान संघात खेळवण्यात आलेला हा सामना उशीरा सुरू झाला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जसप्रित बुमराह, अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्यानं उत्कृष्ठ गोलंदाजी करत पाकिस्तानी संघाला 113 धावांवर गुंडाळण्यात यश मिळवलं.
भारतीय संघाची फलंदाजी ढेपाळली :पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय पाकिस्तानच्या गोलंदाजांनी पावसाच्या मदतीनं योग्य ठरवला. भारतीय संघाच्या डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी केली. मात्र पहिल्या षटकात रोहित शर्मानं एक षटकार ठोकून आपले इरादे स्फष्ट केल्यानंतर पावसानं व्यत्यय आणला. त्यानंतर उशीरा सुरू झालेल्या सामन्यात विराट कोहली केवळ 4 धावा काडून बाद झाला. त्याच्यापोठोपाठ रोहित शर्मा यानंही तंबूची वाट धरली. रोहित शर्मानं 13 धावा काढल्या. त्यानंतर ऋषभ पंत आणि अक्षर पटेल या जोडीनं भारतीय संघाच्या डावाला आकार दिला. अक्षर पटेल यानं 20 धावांचं योगदान दिलं, तर ऋषभ पंतनं 42 धावा ठोकल्या. त्यानंतर मात्र अखेरच्या केवळ 30 धावांच्या मोबदल्यात भारतानं 7 गडी गमावले. अक्षर पटेल आणि ऋषभ पंतच्या धावांच्या जोरावर भारतीय संघानं पाकिस्तानी क्रिकेट संघापुढं 120 धावांचं आव्हान उभं केलं.