महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

रवींद्र जडेजाची राजकारणात एंट्री... 'या' पक्षाचा झाला सदस्य, निवडणुकीच्या रिंगणातही उतरणार? - Ravindra Jadeja in politics

Ravindra Jadeja : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजानं T20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता राजकारणात प्रवेश केला आहे. भारतीय संघाचा स्टार खेळाडू कोणत्या पक्षात सामील झाला, जाणून घेण्यासाठी पूर्ण बातमी वाचा.

Ravindra Jadeja
रवींद्र जडेजाची राजकारणात एंट्री (ANI Photo)

By ETV Bharat Sports Team

Published : Sep 5, 2024, 5:33 PM IST

Updated : Sep 5, 2024, 6:32 PM IST

नवी दिल्ली Ravindra Jadeja : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजानं राजकारणात प्रवेश केला आहे. तो भारतीय जनता पक्षाचा सदस्य झाला आहेत. जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा गुजरातच्या जामनगरमधून भाजपाची आमदार आहे. रिवाबानं नुकतीच जडेजाबद्दलची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. एका पोस्टद्वारे तिनं सांगितलं की, रवींद्र जडेजानं भाजपाचं सदस्यत्व घेतलं आहे. जडेजानं नुकतीच 2024 च्या टी 20 विश्वचषकानंतर या प्रकारातून निवृत्ती जाहीर केली होती.

भाजपाचा सदस्य : रवींद्र जडेजानं पत्नी रिवाबासोबत अनेकदा निवडणुकीचा प्रचार केला आहे. निवडणुकीदरम्यान तो पत्नी रिवाबासोबत भाजपाचा प्रचार करताना दिसला. त्यानं अनेक रोड शोही केले. जडेजाची पत्नी रिवाबा जामनगर उत्तर मतदारसंघातून आमदार आहे. आता रवींद्र जडेजानंही भाजपाचं सदस्यत्व घेतलं आहे. रिवाबानं एक पोस्ट शेअर केली आहे. याद्वारे तिनं सांगितलं की, रवींद्र जडेजा भारतीय जनता पक्षाचा प्राथमिक सदस्य झाला आहे. T20 विश्वचषक 2024 नंतर रिवाबा आणि रवींद्र जडेजा यांनी भारतीय संघासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.

पंतप्रधान मोदींसह जडेजा कुटुंब (ANI Photo)

कारकिर्द कशी :जडेजानं भारतीय संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. त्याचा आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड चांगला आहे. जडेजानं T20 विश्वचषक 2024 नंतर T20 आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. जडेजानं भारतासाठी 74 टी 20 सामने खेळले आहेत. यात त्यानं 515 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्यानं 54 विकेट्सही घेतल्या आहेत. जडेजाची एका सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 15 धावांत 3 बळी. जडेजा अजूनही भारताकडून एकदिवसीय आणि कसोटी सामने खेळणार आहे. त्याच्यासोबत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनीही T20 फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

हेही वाचा :

  1. बैलगाडा शर्यत... महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृतीचं दर्शन दाखवणारा क्रीडा प्रकार; रंजक इतिहास माहितेय का? - Bullock Cart Race
  2. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पोटनिडणुकीत सचिन तेंडुलकरला मोठा धक्का - sachin tendulkar
Last Updated : Sep 5, 2024, 6:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details