महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

वेस्ट इंडिजविरुद्ध 'करो या मरो' सामन्यात श्रीलंका विजय मिळवणार? भारतात दुसरा T20 'इथं' पाहा लाईव्ह

श्रीलंका आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना आज खेळवला जाणार आहे. हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे.

By ETV Bharat Sports Team

Published : 4 hours ago

SL vs WI 2nd T20I Live
SL vs WI 2nd T20I Live (AP Photo)

दांबुला (श्रीलंका) SL vs WI 2nd T20I Live Streaming :श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच 15 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दांबुला येथील रंगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. यापूर्वी 13 ऑक्टोबर रोजी झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजनं यजमान श्रीलंकेचा पाच गडी राखून पराभव केला होता. यासह वेस्ट इंडिज संघानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत चरिथ असलंका श्रीलंकेचे नेतृत्व करत आहे. तर, वेस्ट इंडिजची कमान रोव्हमन पॉवेलच्या खांद्यावर आहे.

पहिल्या सामन्यात काय झालं : मालिकेतील पहिल्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नाणेफेक हारल्यानंतर श्रीलंकेच्या संघानं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 7 गडी गमावून 179 धावा केल्या. श्रीलंकेसाठी चारिथ असलंकाने 59 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. या शानदार खेळीदरम्यान चरित असलंकानं 35 चेंडूत नऊ चौकार मारले. याशिवाय कामिंदू मेंडिसनंही 51 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिज संघाची सुरुवात चांगली झाली आणि पहिल्या विकेटसाठी दोन्ही सलामीवीरांनी शानदार फलंदाजी करत 107 धावा फलकावर लावल्या. वेस्ट इंडिज संघानं 19.1 षटकांत पाच गडी गमावून लक्ष्य गाठलं. वेस्ट इंडिजकडून ब्रँडन किंगनं सर्वाधिक 63 धावांची खेळी खेळली. या स्फोटक खेळीदरम्यान ब्रँडन किंगनं 33 चेंडूत 11 चौकार आणि 1 षटकार ठोकला. ब्रँडन किंगशिवाय एविन लुईसनंही 51 धावा केल्या.

श्रीलंकेसाठी करो या मरो सामना : आज होणाऱ्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात यजमान श्रीलंकेचा संघ सामना जिंकत मालिका बरोबरीत करण्याचा प्रयत्न करेल. परिणामी त्यांच्यासाठी हा सामना करो या मरो यारखा असेल. तर दुसरीकडे वेस्ट इंडिज संघ हा सामना जिंकत तीन सामन्यांची मालिका आजच खिशात घालण्याचा प्रयत्न करेल. अशा परिस्थितीत चाहत्यांना एक रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे.

दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : आकडेवारीनुसार, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेचा संघात काटे की टक्कर असल्याचं दिसतं. उभय संघांमध्ये त्यांच्या T20 कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 16 सामने खेळले गेले आहेत. यात श्रीलंका संघानं 8 सामने जिंकले आहेत, तर वेस्ट इंडिज संघानं 8 सामने जिंकले आहेत.

  • श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा T20 सामना कधी खेळला जाईल?

श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा T20 सामना मंगळवार, 15 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

  • श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा T20 सामना कुठं खेळवला जाईल?

श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा T20 सामना रंगिरी दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दांबुला इथं होणार आहे.

  • श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा T20 सामना किती वाजता सुरु होईल?

श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा T20 सामना भारतीय वेळेनुसार रात्री 7 वाजता सुरु होईल. त्याची नाणेफेक अर्धा तास आधी म्हणजे 06:30 वाजता होईल.

  • श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा T20 सामना टीव्हीवर कुठं पाहायचा?

श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा T20 सामना भारतात टिव्हीवर दिसणार नाही.

  • श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा T20 सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं पहायचं?

श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा T20 सामन्याचं लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही फॅनकोड ॲपवर पाहू शकाल.

सामन्यासाठी दोन्ही संघ :

श्रीलंका : चारिथ असलंका (कर्णधार), पाथुम निसांका, कुसल मेंडिस, कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, दिनेश चंडीमल, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, वानिंदू हसरंगा, महिश थेक्षाना, ड्युनिथ वेलेस, जेफ्री वांडर्से, चामिडू नुस्नानंद फेरनांद, नुनिथरा, बिनदुहरा, चमिडू नुस्नान, बिनदु हसरांगा. , असिथा फर्नांडो.

वेस्ट इंडिज : रोव्हमन पॉवेल (कर्णधार), रोस्टन चेस (उपकर्णधार), फॅबियन ऍलन, ॲलेक अथेनेस, आंद्रे फ्लेचर, टेरेन्स हिंड्स, शाई होप, अल्झारी जोसेफ, शामर जोसेफ, ब्रँडन किंग, एविन लुईस, गुडाकेश मोती, शेरफेन रदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड आणि शामर स्प्रिंगर.

हेही वाचा :

  1. अय्यर-रहाणे-पृथ्वी शॉ फ्लॉप; 42 वेळा रणजी विजेत्या मुंबईचा पहिल्याच सामन्यात दारुण पराभव; पांड्याचा संघ जिंकला
  2. पाकिस्तानच्या विजयासाठी प्रार्थना करणार भारत, T20 विश्वचषकात सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचं भारतीय संघाचं समीकरण कसं?

ABOUT THE AUTHOR

...view details