डरबन SA vs SL 1st Test Live Streaming :दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघात दोन सामन्यांची मालिका सुरु होत आहे. यातील पहिला सामना आजपासून किंग्समीड, डरबन इथं खेळवला जाईल. दोन्ही संघांदरम्यान रोमांचक सामना होण्याची शक्यता आहे.
WTC अंतिम सामन्यासाठी प्रबळ दावेदार :दोन्ही संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी दावेदार आहेत. WTC पॉंईंट टेबलमध्ये श्रीलंका सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. तर आफ्रिका संघ त्यांच्या मागे आहे. सध्या आघाडीवर असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन नेत्रदीपक विजयाची नोंद करण्याचं दोन्ही संघांचं लक्ष्य आहे. श्रीलंकेचा डर्बनमधील किंग्समीड इथं मजबूत रेकॉर्ड आहे, त्यांनी कधीही कसोटी सामना गमावला नाही. यावेळी, पाहुण्या संघानं शानदार गोलंदाजी आणि यंदाच्या वर्षी शानदार सहा विजयी मालिका साकारल्या आहेत. दुसरीकडे, आफ्रिकेनं वेस्ट इंडिज आणि बांगलादेशविरुद्ध मालिका जिंकून 2010 पासून केवळ दोन कसोटी सामने जिंकूत डरबनमध्ये संघर्ष केला आहे.
दोन्ही संघांचं संतुलन कसं : संघांबद्दल बोलायचं झाल्यास, दक्षिण आफ्रिकेच्या संघात कर्णधार टेंबा बावुमानं पुनरागमन केलं आहे, जो दुखापतीतून बरा झाला आहे आणि संघाची जबाबदारी सांभाळेल. मात्र, लुंगी एनगिडी आणि नांद्रे बर्जर दुखापतीमुळं बाहेर आहे. बांगलादेशविरुद्ध 2-0 च्या प्रभावी कसोटी मालिकेतील विजयानंतर, आफ्रिका संघ श्रीलंकाविरुद्ध विजयाचा दावेदार म्हणून सुरुवात करेल. दुसरीकडे, धनंजय डी सिल्वा आणि त्याचे सहकारी 2021 च्या WTC विजेते न्यूझीलंडला मायदेशात 2-0 नं पराभूत केल्यानंतर या मालिकेत प्रवेश करतील आणि आगामी दौऱ्यासाठी एक मजबूत संघ निवडला आहे.
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका 31 वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यात दक्षिण आफ्रिकेनं 16 सामने जिंकले आहेत, श्रीलंकेनं 9 जिंकले आहेत, आणि 6 सामने अनिर्णित राहिले आहेत. एकंदरीतच दोन्ही संघांमध्ये दक्षिण आफ्रिकेचं पारडं जड वाटत आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला सामना : 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर, डरबन
- दुसरा सामना : 5 डिसेंबर ते 9 डिसेंबर. गकबेराह
दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?