दुबई SAW in Final : ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा पहिला उपांत्य सामना गुरुवारी (17 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ यांच्यात खेळला गेला. या रोमांचक सामन्यात आफ्रिकन संघानं 8 गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे महिला T20 विश्वचषक स्पर्धेत आफ्रिकेनं प्रथमच ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. तर गेल्या 15 वर्षांत (5600 दिवस) कांगारु महिला संघाला T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश न करण्याची ही पहिलीच वेळ आहे. शेवटच्या साखळी सामन्यात कांगारुंनी भारताचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.
रविवारी होणार अंतिम सामना : महिला T20 विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना शुक्रवारी (18 ऑक्टोबर) न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज महिला संघांमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. महिला T20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (20 ऑगस्ट) दुबईत होणार आहे.
सहा वेळा विश्वविजेता ऑस्ट्रेलिया दुसऱ्यांदा बाहेर : यावेळी महिला T20 विश्वचषकात असं काही घडलं आहे, जे यापूर्वी 2009 च्या मोसमात घडलं होतं. वास्तविक, 2009 पासून आतापर्यंत 8 महिला T20 विश्वचषक झाले आहेत. यापैकी ऑस्ट्रेलियानं 6 जिंकले आहेत. त्यांना फक्त एकदा 2016 च्या मोसमाच्या अंतिम फेरीत त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर 2009 च्या मोसमात ऑस्ट्रेलियन संघ उपांत्य फेरीत पराभूत होऊन बाहेर पडला होता. यानंतर कांगारु संघ अंतिम फेरीत पोहोचू शकलेला नाही हे दुसऱ्यांदा घडलं आहे. यावेळी चोकर्स नावाच्या दक्षिण आफ्रिकेच्या संघानं इतिहास रचला आहे.