डरबन SA Beat SL by 233 Runs : दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका क्रिकेट संघ यांच्यातील पहिला कसोटी डरबन इथं खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेला 233 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेनं श्रीलंकेला विजयासाठी 516 धावांचं लक्ष्य दिलं होतं. पण पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 282 धावाच करू शकला. दक्षिण आफ्रिकेकडून दुसऱ्या डावात टेम्बा बावुमा आणि स्टब्स यांनी शानदार शतकी खेळी खेळली होती.
पहिल्या डावात श्रीलंकेची दाणादाण : दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात 191 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पहिल्या डावात श्रीलंकेचा संघ केवळ 42 धावा करू शकला. वेगवान गोलंदाज मार्को जॅनसेननं श्रीलंकेविरुद्ध 7 विकेट घेतल्या. श्रीलंकेनं इथंच अर्धा सामना गमावला होता. यानंतर दुसऱ्या डावात स्टब्सनं दक्षिण आफ्रिकेसाठी 183 चेंडूत शतक पूर्ण केलं. आपल्या शतकी खेळीत त्यानं 7 चौकार आणि 2 षटकार मारले. तर कर्णधार टेंबा बावुमानं 202 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेनं दुसऱ्या डावात 366 धावा केल्या आणि श्रीलंकेला 516 धावांचं लक्ष्य दिलं.
यान्सनची भेदक गोलंदाजी :पहिल्या डावात लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी श्रीलंकेचा संघ मैदानात उतरला तेव्हा त्यांनी झटपट विकेट गमावल्या. सलामीवीर पथुम निसांकानं 23 आणि दिमुथ करुणारत्नेनं 4 धावा केल्या. निसांकाला कोएत्झीनं तर करुणारत्नेला रबाडाने बाद केले. दिनेश चंडिमलनं 83 धावांची शानदार खेळी केली. त्याला जेराल्ड कोएत्झीने कापूस टाकले. मार्को यानसेननं दुसऱ्या डावात 4 बळी घेतले. या सामन्यात त्यानं एकूण 11 विकेट घेतल्या. चौथ्या दिवसाच्या खेळात श्रीलंकेला केवळ 282 धावा करता आल्या आणि पहिल्या कसोटीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
मालिकेत आफ्रिकेची विजयी आघाडी : दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता पुढचा सामना 5 डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे. सेंट जॉर्ज पार्कवर हा सामना खेळवला जाईल. श्रीलंकेचा संघ पुढील सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. जे त्यांना जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मदत करेल. दक्षिण आफ्रिकेच्या विजयानंतर WTC पॉइंट टेबलमध्ये काही बदल झाले आहेत.
हेही वाचा :
- न भूतो न भविष्यति... 13 वर्षीय वैभवनं दुबईत मैदानात पाऊल ठेवताच रचला इतिहास; आतापर्यंत कोणालाच जमलं नाही
- AUS vs IND 2nd Test: दिग्गज खेळाडू दुसऱ्या कसोटीपूर्वी जखमी, संघात दोन नव्या खेळाडूंना स्थान