सिडनी Captain To Opt Out Mid-Series : भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एखाद्या कर्णधारानं मालिकेच्या मध्यभागी प्लेइंग-11 मधून स्वतःला वगळण्याची ही बहुधा पहिलीच वेळ आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पाचव्या कसोटीत रोहित शर्मा टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चा भाग नाही. जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्वचितच पाहायला मिळतं.
प्लेइंग-11 मधून बाहेर पडणारा रोहित शर्मा पहिला कर्णधार : कसोटी मालिका सुरु असताना स्वतःला काढून टाकणारा रोहित शर्मा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. सिडनी कसोटीत त्याच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात असं फक्त 4 वेळा घडलं आहे की एखाद्या कर्णधारानं मालिकेच्या मध्यभागी स्वतःला प्लेइंग-11 मधून काढून टाकलं.
आतापर्यंत कोणत्या कर्णधारांनी मालिकेच्या अर्ध्यावर स्वतःला प्लेइंग 11 मधून काढून टाकलं :
मिसबाह-उल-हक (पाकिस्तान) - 2014 विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिका - मिसबाहनं तिसऱ्या वनडे सामन्यातून माघार घेतली आणि त्याच्या जागी शाहिद आफ्रिदीला कर्णधार म्हणून नियुक्त केलं.
दिनेश चंडीमल (श्रीलंका) -2014 T20 विश्वचषक - चंडीमलनं उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्यांसह संघाच्या शेवटच्या तीन सामन्यांमधून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला आणि लसिथ मलिंगाला कर्णधारपद सोपवलं.
माईक डेनेस (इंग्लंड) -1974 ऍशेस - चौथ्या कसोटीसाठी त्यानं प्लेइंग इलेव्हनमधून स्वतःला बाहेर केलं यानंतर जॉन एडरिच संघाचं नेतृत्व करत होता.
रोहित शर्मा (भारत) - 2024-25 बॉर्डर गावस्कर ट्रॉफी - रोहितला सिडनी कसोटीतून स्वतःला बाहेर केलं. त्याच्या जागी जसप्रीत बुमराह संघाची धुरा सांभाळत आहे.
रोहित शर्माचा फॉर्म खराब :2024 हे वर्ष रोहित शर्मासाठी चढ-उतारांनी भरलेलं होतं. त्याच्या नेतृत्वाखाली भारतानं वर्ल्ड कप जिंकला. यानंतर टीम इंडियानं बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत 2-0 असा विजय मिळवला, पण त्या मालिकेत रोहित शर्मा फ्लॉप ठरला. याशिवाय रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध 3-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. या मालिकेतही रोहित शर्मा फलंदाजीत काही विशेष करु शकला नाही. याशिवाय त्यानं ऑस्ट्रेलियातही 5 डावात केवळ 31 धावा केल्या आहेत. अशा स्थितीत कसोटी क्रिकेटमधील रोहित शर्माचा अंत अगदी जवळ आल्याचं दिसते. तो अतिशय वाईट फॉर्ममधून जात आहे.
हेही वाचा :
- 4-0-19-7... दिग्गज गोलंदाजानं T20 सामन्यात 7 फलंदाज केलं आउट, झाला 'वर्ल्ड रेकॉर्ड'
- ऑल इज नॉट वेल... प्लेइंग 11 मधूनच नव्हे तर भारतीय संघातूनही रोहित बाहेर