महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ऋषभ पंत आयपीएलमध्ये खेळणार की नाही? प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी थेटच सांगितलं - ऋषभ पंत

Ricky Ponting on Rishabh Pant : दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत संपूर्ण आयपीएल खेळेल असा विश्वास असल्याचं संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी म्हटलंय. सध्या पंत बेंगळुरुच्या एनसीएमध्ये सराव करत आहे.

ऋषभ पंत
ऋषभ पंत

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 7, 2024, 9:02 PM IST

नवी दिल्ली Ricky Ponting on Rishabh Pant : दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या आयपीएल 2024 समावेशाबाबत महत्त्वपुर्ण वक्तव्य केलंय. यामुळं दिल्ली कॅपिटल्सच्या चाहत्यांना सुखःद धक्का बसलाय.

अपघातात पंत झाला होता जखमी : 26 वर्षीय ऋषभ पंत 30 डिसेंबर 2022 रोजी त्याच्या मूळ गावी रुरकीला जात असताना त्याच्या कारला अपघात झाला होता. या अपघातामुळं त्याच्यावर शस्त्रक्रियाही करावी लागली होती. तेव्हापासून तो क्रिकेटपासून दुर आहे. सध्या ऋषभ पंत बेंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये सराव करतोय. यादरम्यान पंतच्या तंदुरुस्तीमध्ये चांगली प्रगती होत आहे. आयपीएल 2024 साठी त्याच्या फिटनेसकडे त्याच्या क्रिकेटमध्ये पुनरागमनाची चांगली शक्यता म्हणून पाहिलं जातंय.

काय म्हणाले रिकी पाँटिंग : पंतच्या आयपीएल 2024 समावेशाबाबत दिल्ली कॅपिटल्यचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग म्हणाले, "रिषभला आत्मविश्वास आहे की, तो पुनरागमन करण्यास तयार आहे. मात्र त्याची संघात भूमिका काय असेल, याबाबत अद्याप खात्री नाही. पण मी हमी देतो की, जर मी त्याला आता विचारलं तर तो म्हणेल, मी प्रत्येक सामना खेळायला आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास तयार आहे. पंतनं आयपीएल 2024 मध्ये अधिकाधिक सामने खेळल्यास हे कॅपिटल्ससाठी बोनस ठरेल."

पंतच्या पुनरागमनामुळं कॅपिटल्सला दिलासा : मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून आयपीएल 2024 सुरु होण्याची शक्यता आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ गेल्या हंगामात नवव्या स्थानावर होता. यावर्षी पंतच्या पुनरागमनामुळं दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचा आत्मविश्वास वाढेल. यामुळं त्यांच्या कामगिरीत यंदा सुधारणा होऊ शकते.

हेही वाचा :

  1. जसप्रीत बुमराहनं कसोटी क्रमवारीत मिळवलं अव्वल स्थान; 'अशी' कामगिरी करणारा क्रिकेटच्या इतिहासातील पहिलाच गोलंदाज
  2. बीडच्या सचिनच्या खेळीनं भारतीय यंग ब्रिगेड अंडर 19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात; कुटुंबीयांनी व्यक्त केली 'ही' अपेक्षा
  3. भारताची अंडर 19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक, दक्षिण आफ्रिकेचा दोन गडी राखून पराभव

ABOUT THE AUTHOR

...view details