मुंबई Ravindra Jadeja KL Rahul : इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. रवींद्र जडेजानंतर आता स्टार खेळाडू केएल राहुल देखील दुखापतीमुळे संघाबाहेर झाला. हे दोघंही दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडले आहेत. बीसीसीआयनं सोमवारी ही माहिती दिली.
दोघांच्या जागी 'यांचा' समावेश : बीसीसीआयनं आपल्या निवेदनात म्हटलं की, जडेजा आणि राहुल दोघेही जखमी आहेत. यामुळे त्यांना दुसऱ्या कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली. त्यांच्या जागी बोर्डानं सरफराज खान, सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा संघात समावेश केला आहे. आवेश खान सध्या त्याचा रणजी करंडक संघ, मध्य प्रदेश सोबतच राहील. तो गरज पडल्यास कसोटी संघात सामील होईल.
2 फेब्रुवारीपासून दुसरा कसोटी सामना : हैदराबादमधील पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी खेळादरम्यान जडेजाच्या पायाच्या स्नायूला दुखापत झाली होती. तर राहुलनं उजव्या मांडीत दुखत असल्याची तक्रार केली होती. बीसीसीआयचं वैद्यकीय पथक दोघांच्या फिटनेसवर लक्ष ठेवून आहे. भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना 25 जानेवारीपासून हैदराबादमध्ये खेळला गेला. इंग्लंडनं हा सामना 28 धावांनी जिंकला. आता दुसरा कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे खेळला जाणार आहे.
दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार.
हे वाचलंत का :
- आगामी टी-20 विश्वचषकापुर्वी श्रीलंका क्रिकेट बोर्डाला मोठा दिलासा; आयसीसीनं घेतला 'हा' मोठा निर्णय
- हैदराबादमध्ये भारत पहिल्यांदाच हरला कसोटी सामना, जाणून घ्या आणखी कोणते विक्रम मोडले
- साहेबांच्या फिरकीच्या जाळ्यात अडकली टीम इंडिया, इंग्लंडविरुद्ध भारताचा लाजिरवाणा पराभव