मुंबई Sunil Gavaskar Book Inaugration :क्रिकेट विश्वात 'लिटिल मास्टर' म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या जीवनावर आधारित 'सनी जी' या पुस्तकाचं आज मुंबईत प्रकाशन करण्यात आलं. सुनील गावस्कर यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. देवाशिष दासगुप्ता यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. सुनील गावस्कर यांचा 75 वा वाढदिवस दहा जुलै रोजी झाला. त्यानिमित्तानं या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी क्रिकेट जगतातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
'सनी जी' या पुस्तकात सुनील गावस्कर यांच्या कारकीर्दीतील अप्रकाशित पैलूंवर प्रकाशझोत टाकण्यात आलाय. हे पुस्तक रसिकांना आणि वाचकांना नक्कीच आवडेल, अशी अपेक्षा यावेळी दासगुप्ता यांनी व्यक्त केली. सुनील गावस्कर हे नावच असं आहे की, त्यांना परिचयाची गरज नाही, असंही ते यावेळी म्हणाले.
मला खरोखरच परिचयाची गरज : यावेळी बोलताना सुनील गावस्कर म्हणाले की, "मी आता प्रथम श्रेणीच्या क्रिकेटमधून निवृत्त होऊन 40 वर्षे झाली. त्यामुळं आता नव्या पिढीला खरोखरच माझ्या परिचयाची गरज आहे. मी जेव्हा क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तेव्हा माझी ओळख माधव मंत्री यांचा पुतण्या, अशी करून दिली जायची. त्यामुळं मला खरोखरच परिचयाची गरज तेव्हाही होती आणि आताही आहे. मला माझी क्रिकेट कारकीर्द पुन्हा ऐकायला बरं वाटेल."
त्यानंतर दास गुप्ता यांनी पुन्हा एकदा व्यासपीठावर येऊन सुनील गावस्कर यांची संपूर्ण ओळख करून दिली. सुनील गावस्कर यांनी रचलेले विक्रम आणि त्यांच्या कारकीर्दीबद्दल माहिती दिली. सुनील गावस्कर यांच्या जीवनावरील हे पुस्तक निश्चितच वाचनीय आहे आणि ते सर्वांना आवडेल, असंही ते यावेळी म्हणाले.
हेही वाचा
- दोनवेळचा विश्वविजेता कर्णधार पंजाबच्या ताफ्यात, संघाला जिंकवून देणार पहिलं IPL? - Punjab Kings Coach
- T20 ला अलविदा करणाऱ्या रोहित शर्माचं मोठं विधान; म्हणाला, 'आजकाल निवृत्ती हा एक...' - Rohit Sharma Big Statement
- अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला ODI सामना भारतात 'इथं' दिसणार लाईव्ह? वाचा सविस्तर - AFG VS SA 1ST ODI LIVE IN INDIA