डरबन Patrick Kruger Bowled 11 Ball His First Over : T20 विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघानं आपला दबदबा कायम राखत आणखी एका मालिकेत विक्रमी कामगिरी केली आहे. विश्वचषक फायनलनंतर पहिल्यांदाच भिडणाऱ्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याचा निकाल 29 जून रोजी सारखाच लागला. डरबनमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या T20 सामन्यात भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेचा 61 धावांच्या मोठ्या फरकानं पराभव केला आणि 1-0 अशी आघाडी घेतली. विक्रमी शतक झळकावणारा सलामीवीर संजू सॅमसन (107) भारतीय संघाच्या विजयाचा शिल्पकार होता. तर वरुण चक्रवर्ती (3/25) आणि रवी बिश्नोई (3/28) या फिरकी जोडीनं मिळून अर्धा संघ उद्ध्वस्त केला.
नेमकं काय झालं : तथापि, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज पॅट्रीक क्रुगरनं भारताच्या फलंदाजीदरम्यान एका ओव्हरमध्ये एक किंवा दोन नव्हे तर एकूण 11 चेंडू टाकले. हे थोडं विचित्र वाटेल, पण हे खरं आहे. आफ्रिकन संघासाठी डावातील नववं षटक टाकण्यासाठी आलेल्या क्रुगरनं आपल्या षटकात एकूण 11 चेंडू टाकले. खरं तर, त्याच्या स्पेलच्या पहिल्याच षटकात सहा चेंडूंव्यतिरिक्त, क्रुगरनं तीन वाइड आणि दोन नो बॉल टाकले. त्यामुळं त्याला एकूण 11 चेंडू टाकावे लागले. मात्र, एवढं करुनही त्यानं शेवटच्या चेंडूवर भारतीय कर्णधाराची विकेट मिळवण्यात यश मिळवलं. क्रुगरचा शेवटचा चेंडू नकल बॉल होता. ज्यात सूर्यकुमार यादव त्याच्या जाळ्यात अडकला. याचा परिणाम असा झाला की चेंडू डीप स्क्वेअर लेगवर असलेल्या अँडिले सिमेलेनकडे गेला. जिथे सिमेलननं कोणतीही चूक केली नाही. यासह सूर्याचा डावही संपुष्टात आला.