ETV Bharat / sports

0,0,0,0,0,0,0...शुन्यावर आउट झाले 18 फलंदाज; क्रिकेटच्या इतिहासातील पहिलीच वेळ - MOST BATTERS OUT ON DUCK

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीला पर्थमध्ये सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी या सामन्यात 17 विकेट पडल्या आहेत.

18 Batters of India out on Zero
प्रतिकात्मक चित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Sports Team

Published : Nov 23, 2024, 6:37 AM IST

पर्थ 18 Batters of India out on Zero : भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघत पर्थ इथं खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी असं काही पाहायला मिळालं की ज्याची अपेक्षा कोणीही केली नसेल. पर्थ कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघ अवघ्या 150 धावांत गडगडला आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियानंही अवघ्या 67 धावांत 7 विकेट गमावल्या. अशा प्रकारे संपूर्ण दिवसात एकूण 17 विकेट पडल्या. पर्थ कसोटीच्या पहिल्या दिवशी एकही अर्धशतक झळकावलं नाही पण 5 मोठ्या गोष्टी नक्कीच पाहायला मिळाल्या, जाणून घ्या त्यांची माहिती.

भारतीय संघाचा 150 चा लाजिरवाणा आकडा : पर्थमध्ये भारतीय संघ अवघ्या 150 धावांवर ऑल आउट झाला. जी ऑस्ट्रेलियन भूमीवर भारताची सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी सिडनीमध्येही भारतीय संघ 150 धावांत आटोपला होता. हा सामना 2000 साली झाला होता. 1947 मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियात दुसऱ्या डावातही भारतीय संघ 58 धावांत ऑलआऊट झाला होता.

इतकी वाईट स्थिती पहिल्यांदाच : भारतीय संघ यंदा पाचव्यांदा कसोटी सामन्यात 160 पेक्षा कमी धावसंख्येवर सर्वबाद झाला आहे. याआधी केवळ 1952 आणि 1959 मध्ये भारतीय संघाची कसोटी सामन्यांमध्ये अशी वाईट स्थिती झाली होती.

18 फलंदाज शुन्य धावांवर बाद : जैस्वाल, पडिक्कल पर्थ कसोटीत शून्यावर बाद झाले. यासह यावर्षी भारताचे 18 फलंदाज कसोटी सामन्यात शून्यावर बाद झाले आहेत. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वात खराब कामगिरी आहे. याआधी 2008 आणि 1983 मध्ये कसोटी सामन्यात 17 भारतीय फलंदाज शून्यावर बाद झालं होतं.

विराटची खराब कामगिरी सुरुच : विराट कोहलीला यावर्षी 26 डावांमध्ये 12 वेळा दुहेरी आकडा गाठण्यात अपयश आलं आहे. कोणत्याही भारतीय खेळाडूची ही सर्वात खराब कामगिरी आहे. रोहित शर्मा या वर्षी 12 वेळा दुहेरी आकडा गाठण्यात अपयशी ठरला पण त्यानं 35 डाव खेळले आहेत.

ऋषभ पंतचा विश्वविक्रम : ऋषभ पंतनं ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर 661 कसोटी धावा केल्या आहेत. यासह तो ऑस्ट्रेलियन भूमीवर सर्वाधिक धावा करणारा परदेशी यष्टीरक्षक बनला आहे. विशेष म्हणजे अवघ्या 13 डावांत त्यानं ही कामगिरी केली आहे.

पहिल्या दिवशी गोलंदाजांचं वर्चस्व : सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराहनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर भारतीय संघ छोट्या धावसंख्येवर बाद झाला तेव्हा बुमराहचा निर्णय चुकल्याचं दिसत होतं. पण भारतीय गोलंदाजी येताच बुमराह बरोबर असल्याचं दिसलं. भारतीय संघ अवघ्या 150 धावा करु शकला असताना ऑस्ट्रेलियानं 40 धावा करण्यापूर्वीच आपल्या 5 विकेट गमावल्या होत्या तर पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कांगारुंच्या 67 धावांवर 7 विकेट गेल्या होत्या.

हेही वाचा :

  1. 8,10,2,0,11,6,3...हा मोबाईल नंबर नव्हे तर ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या धावा, कांगारुंनी 1980 नंतर दुसऱ्यांदा पाहिला सर्वात लाजिरवाणा दिवस
  2. 6,6,4,6,6,6...युवा फलंदाजाचा कहर, एकाच ओव्हरमध्ये 34 धावा काढत ठोकलं वादळी अर्धशतक; पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.