पॅरिस 4 August India Olympics Schedule : पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा आठवा दिवस भारतासाठी निराशाजनक होता आणि देशाच्या आणखी एक पदक जिंकण्याच्या आशा धुळीस मिळाल्या. कारण भारतीय नेमबाज मनू भाकेरचं महिलांच्या 25 मीटर पिस्तुल प्रकारात पदक हुकलं. पण आज नवव्या दिवशी भारताला पदक निश्चित करण्यासाठी एक पाऊल पुढं जाण्याची संधी असेल.
नेमबाजी : भारतासाठी नेमबाजीत, 25 मीटर रॅपिड फायर मेन्स क्वालिफायर स्टेज 1 खेळला जाईल. यामध्ये भारतासाठी विजयवीर सिद्धू आणि अनिश बनवाला दिसणार आहेत. यानंतर स्कीट महिला पात्रतेच्या दुसऱ्या दिवशी रायजा ढिल्लन आणि माहेश्वरी चौहान दिसणार आहेत.
- 25 मीटर रॅपिड फायर पुरुष पात्रता टप्पा 1 (विजयवीर सिद्धू आणि नीश बनवाला) - दुपारी 12:30 वाजता
- स्कीट महिला पात्रता दिवस 2 (रयजा ढिल्लन आणि माहेश्वरी चौहान) - दुपारी 1 वाजता
हॉकी : पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या नवव्या दिवशी भारतीय हॉकी संघ उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनशी भिडणार आहे. हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला उपांत्य फेरी गाठून पदकाच्या शर्यतीत एक पाऊल पुढं टाकण्याची संधी असेल. भारतानं ग्रुप स्टेजमध्ये एकूण 5 सामने खेळले, त्यापैकी 3 सामने जिंकले, 1 सामना अनिर्णित राहिला आणि 1 सामना गमावला. ग्रुप स्टेजमध्ये भारतानं न्यूझीलंड, आयर्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव केला, तर अर्जेंटिनाशी बरोबरी साधली आणि बेल्जियमनं पराभूत केलं. आता उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी संघ पूर्णपणे सज्ज झाला आहे.
- पुरुषांची उपांत्यपूर्व फेरी (भारत विरुद्ध ग्रेट ब्रिटन) - दुपारी 01:30 वाजता
ऍथलेटिक्स : भारतासाठी ऍथलेटिक्समध्ये, पारुल चौधरी महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेस फेरी 1 मध्ये आपला दावा सादर करताना दिसेल, तर जेसविन ऑल्ड्रिन पुरुषांच्या लांब उडी पात्रतेमध्ये दिसेल. भारतीय चाहत्यांना या दोघांकडून ॲथलेटिक्समध्ये उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा असेल.
- महिलांची 3000 मीटर स्टीपलचेस फेरी 1 (पारुल चौधरी) - दुपारी 1:35 वाजता
- पुरुषांची लांब उडी पात्रता - दुपारी 2:30 वाजता