महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

पॅरिसमध्ये कडाक्याच्या उन्हामुळं खेळांडूंची लाही लाही; क्रीडा मंत्रालयानं उचललं मोठं पाऊल - Paris Olympics 2024

Paris Olympics 2024 : ऑलिम्पिक 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी पॅरिसमध्ये उपस्थित असलेले भारतीय खेळाडू कडाक्याच्या उन्हामुळं हैराण झाले होते. या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं मोठं पाऊल उचललं आहे.

Paris Olympics 2024
पॅरिस ऑलिम्पिक (ETV Bharat)

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 3, 2024, 7:13 PM IST

पॅरिस Paris Olympics 2024 : सध्या पॅरिसमध्ये ऑलिम्पिक सुरु आहे. याचवेळी पॅरिसमध्ये सूर्य तळपत असल्यानं उन्हाचा तडाखा असह्य झाल्यानं खेळाडू उष्णतेनं होरपळत आहेत. हे टाळलं नाही तर ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो.

क्रीडा मंत्रालयानं पॅरिसला दिले 40 एसी : क्रीडा मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पॅरिसमधील तापमानात अचानक वाढ झाल्यामुळं ऑलिम्पिक गेम्स व्हिलेजमध्ये खेळाडूंना येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन शुक्रवारी सकाळी क्रीडा मंत्रालय, SAI, IOA आणि फ्रान्समधील भारतीय दूतावास दरम्यान एक समन्वय बैठक झाली. या बैठकीत फ्रान्समधील भारतीय दूतावास पॅरिसमधील 40 एसी खरेदी करेल आणि भारतीय खेळाडू ज्या स्पोर्ट्स व्हिलेजमध्ये राहात आहेत, त्या खोल्यांमध्ये ते उपलब्ध करुन देईल, असा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा परिणाम म्हणून, फ्रान्समधील भारतीय दूतावासानं आधीच एसी खरेदी केले आहेत, जे गेम्स व्हिलेजमध्ये वितरित केले गेले आहेत.

भारतीय खेळाडूंना उन्हापासून दिलासा : परिणामी खेळाडूंनी एसी वापरण्यास सुरुवात केली आहे. यामुळं त्यांना अधिक आरामदायी आणि चांगली विश्रांती मिळेल, जे त्यांना चांगल्या कामगिरीसाठी खूप महत्वाचं आहे. सर्व एसींचा खर्च क्रीडा मंत्रालयानं उचलला आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची कामगिरी : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतानं आतापर्यंत शूटिंगमध्ये सर्व 3 कांस्यपदकं जिंकली आहेत. मनू भाकरनं 10 मीटर एअर पिस्तूल वैयक्तिक स्पर्धेत कांस्यपदक आणि 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत सरबज्योत सिंगसह कांस्यपदक जिंकलं. तर स्वप्नील कुसळे यानं 50 मीटर रायफलमध्ये कांस्यपदक पटकावलं आहे. तसंच भारतीय पुरुष हॉकी संघानं 50 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पराभूत करत इतिहास रचला आहे. या विजयासह भारतीय संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाले आहेत.

हेही वाचा :

  1. ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजीत भारताला पदकाची प्रतिक्षा कायम...; उपांत्यपूर्व सामन्यात दीपिकाचा पराभव - Paris Olympics 2024
  2. गर्लफ्रेंडनं सुवर्णपदक जिंकताच बॉयफ्रेंडनं केलं 'प्रपोज'; ऑलिम्पिकदरम्यान 'सिटी ऑफ लव्ह'मध्ये काय घडलं, एकदा व्हिडिओ बघाच... - Paris Olympics 2024
  3. एक निशाणा चुकला अन् मनू भाकरची ऐतिहासिक 'मेडल हॅटट्रिक' हुकली - Paris Olympics 2024

ABOUT THE AUTHOR

...view details