महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या स्वप्नीलच्या गावात दिवाळी; मायदेशी परतल्यानंतर 'असं' होणार स्वागत - paris olympics 2024 - PARIS OLYMPICS 2024

Swapnil Kusale : पॅरिस इथं सुरु असलेल्या ऑलिम्पिकमध्ये कोल्हापूरचा नेमबाज स्वप्नील सुरेश कुसाळेनं कांस्यपदक जिंकल्यानंतर त्याचं जन्मगाव असलेल्या कांबळवाडी या गावात दिवाळी साजरी झाली.

Swapnil Kusale
स्वप्नीलच्या घरी जल्लोष (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Sports Team

Published : Aug 1, 2024, 7:02 PM IST

Updated : Aug 1, 2024, 7:57 PM IST

कोल्हापूर Swapnil Kusale : पॅरिस इथं सुरु असलेल्या ऑलिम्पिकमध्ये कोल्हापूरचा नेमबाज स्वप्नील सुरेश कुसाळेनं पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन्सच्या अंतिम फेरीत टक्कर देत तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवलं. ऑलिम्पिकमध्ये कोल्हापूरच्या या पठ्ठ्यानं बाजी मारत कांस्यपदकाची कमाई केली. स्वप्नीलनं कांस्यपदक मिळवल्याचं समजताच त्याच्या कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी स्वप्निलच्या कांबळवाडी येथील घरात जल्लोष करत त्याच्या कामगिरीचं कौतुक केलं. यावेळी स्वप्निलच्या घरात स्वप्निलच्या विजयाच्या घोषणा देत टाळ्या वाजवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या स्वप्नीलच्या गावात दिवाळी (ETV Bharat Reporter)

गावात साजरी झाली दिवाळी : अतिशय अटीतटीच्या झालेल्या लढतीत कोल्हापूरचा स्टार नेमबाज स्वप्नील कुसाळेनं 1952 नंतर वयक्तिक ऑलिम्पिक पदकावर मोहर उमटवल्यानंतर कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील त्याचं जन्मगाव असलेल्या कांबळवाडी या गावात दिवाळी साजरी झाली. स्वप्नीलनं पदक जिंकल्यानंतर सर्व गावकऱ्यांनी त्याचे वडील सुरेश कुसाळे, आई अनिता कुसाळे आणि भाऊ सुरज कुसाळे यांचं साखर तसंच पेढे भरुन अभिनंदन केलं तर गावकऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला.

स्वप्निलची निघणार हत्तीवरुन मिरवणूक : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशन क्रीडा प्रकारात कोल्हापूरचा स्टार नेमबाज स्वप्नीलनं कांस्यपदकावर नाव कोरल्यानंतर कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याच्या कुटुंबीयांचा आनंद तर गगनात मावेनासा झाला, घरात गुलाल आणि साखर पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. तसंच तो मायदेशी परतल्यानंतर कोल्हापूरपासून कांबळवाडी गावापर्यंत स्वप्नीलची हत्तीवरुन मिरवणूक काढणार असल्याचं वडील सुरेश कुसाळे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.

भारताला मिळवून दिलं तिसरं पदक : कोल्हापूरचा सुपुत्र स्वप्नील कुसाळेनं पुरुषांच्या 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशनच्या अंतिम फेरीत तिसऱ्या स्थानी राहात कांस्यपदकाला गवसणी घातली. या आलिम्पिकमधील हे भारताचं तिसरं पदक ठरलंय. यापुर्वी मनु भाकरनं एकेरीत आणि मिश्रमध्ये भारताला कांस्यपदक मिळवून दिलं. विशेष म्हणजे पुरुषांच्या 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशनमध्ये पदक मिळवणारा पहिलाच भारतीय खेळाडू ठरलाय. त्यानं एकूण 451.4 गुण मिळवत कांस्यपदकाला गवसणी घातली.

हेही वाचा :

  1. अभिनव बिंद्राला पाहण्यासाठी सोडली होती बारावीची परिक्षा, महाराष्ट्राच्या 'धोनी'नं कसं जिंकलं पॅरिस? - Paris Olympics 2024
  2. पॅरिसमध्ये मराठी डंका... कोल्हापूरच्या सुपुत्रानं अचूक 'नेम' लावत रचला इतिहास, भारताला मिळालं तिसरं पदक - Paris Olympics 2024
Last Updated : Aug 1, 2024, 7:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details