पॅरिस Neeraj Chopra Won Silver Medal in Olympic 2024 : नीरज चोप्रानं भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ८९.४५ थ्रो करत रौप्यपदक मिळवलं. यंदाच्या ऑलिम्पिकमधील भारताचं हे पहिलं रौप्यपदक आहे. नीरज चोप्राचे अंतिम फेरीत पाचपैकी ४ थ्रो फाऊल गेले. नंतर त्यानं दुसऱ्याच थ्रोमध्ये ८९ मीचा टप्पा गाठला आणि अर्शद नदीम वगळता इतर कोणताही खेळाडू या क्रमांकापर्यंत पोहोचू शकला नाही.
पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं जिंकलं सुवर्णपदक :पाकिस्तानचा स्टार भालाफेकपटू अर्शद नदीम याने दुसऱ्या प्रयत्नात ९२.९७ मीटर भालाफेक केला. त्यानं वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह ऑलिम्पिकमध्ये नवीन विक्रम केला. या थ्रोसह त्याने स्पर्धेत अव्वल स्थान पटकावत सुवर्णपदक मिळवलं.
नीरजची सुरुवात झाली खराब : नीरज चोप्रा हा टोकियो ऑलिम्पिक 2020 चा सुवर्णपदक विजेता आहे. त्यामुळं त्याच्याकडून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडलची सर्व भारतीयांना आशा होती पॅरिस ऑलिम्पिकच्या शेवटच्या सामन्यात त्याची चांगली सुरुवात झाली नाही. त्यानं पहिल्याच प्रयत्नात फाऊल थ्रो केला. त्यामुळं तो सुरुवातीलाच दडपणाखाली दिसला. अशातच त्याने 6 थ्रोमध्ये 5 फाऊल फेकले.