पॅरिस Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कॅनडाच्या महिला फुटबॉल संघाचे सहा गुणांची कपात करण्यात आली. तसंच ड्रोन हेरगिरी प्रकरणामध्ये शनिवारी त्यांच्या तीन प्रशिक्षक कर्मचाऱ्यांवर प्रत्येकी एका वर्षासाठी बंदी घालण्यात आली. बुधवारी सलामीच्या सामन्यापूर्वी प्रतिस्पर्धी न्यूझीलंडच्या सराव सत्रांची हेरगिरी करण्यासाठी कॅनडानं ड्रोनचा वापर करुन त्याला पकडण्यात आल्याची माहिती आहे.
कारवाईमुळं सामन्यांवर परिणाम होणार : कॅनडियन सॉकर असोसिएशन (CSA) आणि तिचे अधिकारी बेव्हरली प्रिस्टमन, जोसेफ लोंबार्डी आणि जास्मिन मँडर यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सुरु केल्यानंतर, फिफा शिस्तपालन समितीच्या अध्यक्षांनी हे प्रकरण थेट फिफाकडे कलम 56.3 नुसार पाठवल्याचं फिफानं म्हटलं आहे. या कार्यवाहीच्या निकालामुळं चालू असलेल्या महिला ऑलिम्पिक फुटबॉल स्पर्धेच्या सामन्यांवर परिणाम होईल. या शक्यतेमुळं XXXIII पॅरिस ऑलिम्पिक अंतिम स्पर्धा आणि प्रतिसादकर्त्यांच्या हक्कांचं संरक्षण करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला. फिफानं कॅनेडियन सॉकर असोसिएशन (CSA) ला फिफा अनुशासनात्मक संहितेच्या कलम 13 आणि XXXIII पॅरिस ऑलिम्पिक फायनल कॉम्पिटिशन (OFT) च्या कलम 6.1 चं उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा दिली.