महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

पॅरिस ऑलिम्पिकसाठी बॉक्सिंग ड्रॉ जाहीर; स्टार बॉक्सर निखत झरीन आणि लोव्हलिनासमोर कडवं आव्हान - Paris Olympics 2024 - PARIS OLYMPICS 2024

Paris Olympics 2024 Boxing Draw : पॅरिस 2024 ऑलिम्पिकसाठी बॉक्सिंगचा ड्रॉ गुरुवारी जाहीर झाला. यात भारताचे स्टार बॉक्सर निखत झरीन आणि लोव्हलिना बोरगोहेन यांच्यासमोर विजेतेपदाच्या शर्यतीत कडवं आव्हान असेल.

Paris Olympics 2024 Boxing Draw
पॅरिस ऑलिम्पिकसाठी बॉक्सिंग ड्रॉ जाहीर (ANI photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 26, 2024, 1:49 PM IST

पॅरिस Paris Olympics 2024 :पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी बॉक्सिंगचे ड्रॉ गुरुवारी जाहीर झाले. यात भारतीय महिला बॉक्सर निखत झरीन आणि लोव्हलिना बोरगोहेन यांच्यासमोर खडतर आव्हान असणार आहे. महिलांच्या 50 किलो गटात 32 च्या फेरीत निखतचा सामना जर्मनीच्या मॅक्सी क्लोत्झरशी होईल. या सर्व बॉक्सिंग स्पर्धांची सुरुवात 27 जुलै रोजी एरिना पॅरिस नॉर्ड इथं होईल.

  • लोव्हलिना बोरगोहेन

लोव्हलिनासाठी या ऑलिम्पिकमध्ये पदकाचा मार्ग सोपा नसेल. महिलांच्या 75 किलो गटात तिचा सामना नॉर्वेच्या सुनिव्हा हॉफस्टॅडशी होणार आहे. यानंतर उपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना चीनच्या ली कियानशी होऊ शकतो.

  • निखत जरीन

निखतची प्रतिस्पर्धी वू यू ही तिच्या श्रेणीतील अव्वल क्रमांकाची बॉक्सर आहे तसंच ती सध्याची 52 किलो वजन गटातील विश्वविजेती आहे. निखतनं चिनी आव्हानावर मात केल्यास उपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना थायलंडच्या चुथामात रक्सात किंवा उझबेकिस्तानच्या सबिना बोबोकुलोवा यांच्याशी होईल. निखतला या वर्षाच्या सुरुवातीला खेळल्या गेलेल्या स्ट्रॅन्डजा मेमोरियल अंतिम सामन्यात बोबोकुलोवाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.

  • जास्मिन लांबोराई

जस्मिन लॅम्बोराई तिच्या ऑलिम्पिक मोहिमेची सुरुवात महिलांच्या 57 किलो गटात टोकियो 2020 ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या फिलिपाइन्सच्या नेस्टी पेटेसिओविरुद्ध करेल. ती जिंकल्यास जस्मिनचा पुढील फेरीत तिसऱ्या मानांकित फ्रान्सच्या अमिना झिदानीशी सामना होईल.

  • अमित पंघल आणि निशांत देव

आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेती प्रीती पवारचा 32 च्या फेरीत व्हिएतनामच्या वो थी किम आन्ह विरुद्ध ड्रॉ निघाला. तर अमित पंघाल आणि निशांत देव यांना त्यांच्या सुरुवातीच्या सामन्यात बाय मिळाला आहे. मात्र, अमितचा सलामीच्या लढतीत झांबियाच्या पॅट्रिक चिनयेम्बाविरुद्ध तर निशांत देवचा सामना इक्वेडोरच्या जोस रॉड्रिग्ज टेनोरिओशी होणार आहे.

हेही वाचा :

  1. पॅरिस ऑलिम्पिकचं आज भव्य उद्घाटन; 128 वर्षांच्या इतिहासात प्रथमच 'असा' होणार उद्घाटन सोहळा - Paris Olympics 2024
  2. तिरंदाजीत भारताचा धमाका, महिलांपाठोपाठ पुरुष संघही उपांत्यपूर्व फेरीत - Paris Olympics 2024
  3. जगातील सर्वात मोठ्या क्रीडा महोत्सवाला सुरुवात; 'या' खेळाडूंकडून भारताला पदकाची अपेक्षा - Paris Olympics 2024

ABOUT THE AUTHOR

...view details