सिडनी Yashasvi Jaiswal 16 Runs in Over : भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 च्या शेवटच्या आणि 5व्या कसोटीत, दोन्ही संघांचा पहिला डाव 2 दिवसात संपला. भारतीय संघाचा पहिला डाव 185 धावांत आटोपला होता, तर चहापानाच्या विश्रांतीपूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ 181 धावांत आटोपला होता. अशाप्रकारे पहिल्या डावाच्या जोरावर भारतीय संघ चार धावांची आघाडी मिळवण्यात यशस्वी ठरली.
🚨 YASHASVI JAISWAL SMASHED MOST RUNS FOR INDIA IN THE OPENING OVER OF A TEST INNINGS. 🚨pic.twitter.com/dGEa2lSbSS
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 4, 2025
विराट कोहली झाला कर्णधार : मात्र दुसऱ्या दिवशी भारताला पहिल्या सत्रानंतर मोठा धक्का बसला, जेव्हा भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराह फक्त एक षटक टाकल्यानंतर लंचनंतर मैदानाबाहेर गेला. तो जवळपास अर्धा तास मैदानाबाहेर राहिला आणि त्यानंतर तो कारमध्ये बसून स्कॅनसाठी स्टेडियमच्या बाहेर जाताना दिसला. बुमराहच्या बाहेर पडल्यानंतर विराट कोहलीनं कर्णधारपदाची धुरा सांभाळली आणि ऑस्ट्रेलियाला 181 धावांवर रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सिराज आणि कृष्णानं प्रत्येकी 3 बळी घेतले.
दुसऱ्या डावात जयस्वालची स्फोटक सुरुवात : ऑस्ट्रेलियाला 181 धावांत गुंडाळल्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल ही सलामी जोडी दुसऱ्या डावाला सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरली. मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलियासाठी पहिलं षटक टाकण्यासाठी आला ज्यात यशस्वी जैस्वालनं चौकार मारले. पहिल्या चेंडूवर डॉट खेळल्यानंतर जैस्वालनं दुसऱ्या चेंडूवर चौकार मारुन खातं उघडलं आणि त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरही चौकार मारले. पाचव्या चेंडूवर एकही धाव आली नाही पण जैस्वालनं शेवटच्या चेंडूवर चौकार मारुन ओव्हर संपवली. अशा प्रकारे जैस्वालनं डावाच्या पहिल्याच षटकात 4 चौकारांच्या मदतीनं 16 धावा करत इतिहास रचला.
Yashasvi Jaiswal smashed 4 boundaries in the opening over of Mitchell Starc. pic.twitter.com/s9PwiR5NfE
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 4, 2025
कसोटीच्या इतिहासात चौथ्यांदा घडलं : कसोटी क्रिकेटच्या इतिहासात हे चौथ्यांदाच घडलं जेव्हा एखाद्या फलंदाजानं डावाच्या पहिल्याच षटकात 16 धावा काढण्याचा महान पराक्रम केला. इतकंच नाही तर भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात तर हे पहिल्यांदाच पाहायला मिळालं. याआधी मायकेल स्लेटर, ख्रिस गेल आणि ओशादा फर्नांडो यांनी कसोटीत एका डावाच्या पहिल्याच षटकात 16 धावा काढण्याचा चमत्कार केला होता.
कसोटीत एका डावाच्या पहिल्या षटकात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज :
- 16 धावा - यशस्वी जैस्वाल विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सिडनी, 2025
- 16 धावा - मायकेल स्लेटर विरुद्ध इंग्लंड, बर्मिंगहॅम, 2001
- 16 धावा - ख्रिस गेल विरुद्ध न्यूझीलंड, अँटिग्वा, 2012
- 16 धावा - ओशादा फर्नांडो विरुद्ध बांगलादेश, मीरपूर, 2022
Yashasvi Jaiswal smashed 4,4,4,0,4 in 5 balls vs Starc. 🥶 pic.twitter.com/gEyjjwzmur
— Tanuj Singh (@ImTanujSingh) January 4, 2025
कसोटीत डावाच्या पहिल्याच षटकात सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज :
- 16 धावा - यशस्वी जैस्वाल विरुद्ध ऑस्ट्रेलिया, सिडनी, 2025
- 13 धावा - रोहित शर्मा विरुद्ध ऑस्ट्रेलिया, नागपूर, 2023
- 13 धावा - वीरेंद्र सेहवाग विरुद्ध पाकिस्तान, कोलकाता, 2005
हेही वाचा :