पॅरिस Paris Olympics 2024 Archery : तिरंदाजीच्या मिश्र प्रकारात अंकिता भकट आणि धीरज बोमादेवरा या भारतीय जोडीचा अमेरिकेच्या केसी कौफोल्ड आणि ब्रॅडी एलिसन यांच्याकडून पराभव झाला. अमेरिकेच्या खेळाडुंनी तिरंदाजी मिश्र सांघिक स्पर्धेत भारताचा 6-2 असा पराभव केला आहे.
- अमेरिकेने पटकावलं कांस्यपदक : पहिल्या चार सेटपर्यंत अमेरिकेनं भारताला एकही संधी दिली नाही. यानंतर पाचव्या सेटमध्ये भारताने पुनरागमन करत सेट जिंकला. मात्र सहाव्या सेटमध्ये अमेरिकेने पुन्हा पुनरागमन करत भारताचा पराभव केला. हा सामना जिंकत अमेरिकेनं कांस्यपदक पटकावलं आहे.
उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाकडून पराभव :याआधी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी तिरंदाजीच्या मिश्र स्पर्धेत अंकिता भकट आणि धीरज बोमादेवरा यांचा उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाच्या सिह्योन लिम आणि वूजिन किम यांच्याशी सामना झाला होता. यात दक्षिण कोरियानं भारताचा 6-2 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.
उपांत्यपूर्व फेरीत इंडोनेशियाचा केला होता पराभव : भारतीय जोडीनं इंडोनेशियाचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती. हा सामना 5-1 ने जिंकला. या जोडीने पहिला सेट 37-36 असा जिंकला होता. दुसऱ्या सेटमध्ये इंडोनेशियन जोडीने जोरदार पुनरागमन करत स्कोअर 38-38 असा बरोबरीत सोडवला. यानंतर भारतीय जोडीने पुनरागमन करत 1 गुण मिळवला. यानंतर भारताने पुढील फेरीत 38-37 असा विजय मिळवत दोन आवश्यक गुण मिळवले. भारतानं हा सामना 5-1 असा जिंकून उपांत्य फेरीत धडक मारली होती.
- नेमबाजीमध्ये भारताला तीन पदकं : भारताने आतापर्यंत नेमबाजीमध्ये तीन पदके जिंकली आहेत. मनू भाकरने नेमबाजीमध्ये दोन पदकं जिंकून आतापर्यंतची सर्वात यशस्वी भारतीय खेळाडू म्हणून उदयास आली आहे. त्यापैकी एक पदकं वैयक्तिक स्पर्धेत आणि एक पदकं मिश्र स्पर्धेत मिळालं आहे.
हेही वाचा
- स्वप्निल कुसाळे आता 'ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी' ; ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकताच मध्य रेल्वेनं दिली पदोन्नती - Paris Olympics 2024
- अवघ्या 46 सेकंदात बॉक्सिंगमध्ये विजय, महिलेविरुद्ध पुरुष बॉक्सर रिंगणात? पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नवा वाद - Paris Olympics 2024
- पॅरिस ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता स्वप्नील कुसाळे यांची 'अशी' काढणार मिरवणूक, कुटुंबाचा आनंद गगणात मावेना - Paris Olympics 2024
- स्वप्नील कुसाळेनं कांस्यपदक केलं देशाला समर्पित - Swapnil Kusale