पॅरिस Paris Olympic 2024 : जगभरात चर्चेत असणाऱ्या युक्रेनचे खासदार झान बेलेनियुक यांनी गुरुवारी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये 85 किलो ग्रीको-रोमन प्रकारात कांस्यपदक जिंकले. बेलेनियुकनं कांस्यपदकाच्या लढतीत पोलंडच्या अर्काडियस कुलीनिक्झचा 3-1 असा पराभव केला. या विजयासह 33 वर्षीय खेळाडूनं राजकारणातील त्यांच्या कारकिर्दीवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी व्यावसायिक कुस्तीतून निवृत्तीची घोषणा केली. बेलेनियुक हे दोन वेळा जागतिक कुस्ती चॅम्पियन देखील आहेत. तसंच जागतिक स्पर्धेत एक रौप्य आणि दोन कांस्यपदकं जिंकली आहेत.
यापूर्वी जिंकलं सुवर्ण आणि रौप्यपदक : वयाच्या नऊव्या वर्षी कुस्तीला सुरुवात करणाऱ्या या कुस्तीपटूनं 2020 टोकियो येथील ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक आणि 2016 च्या रिओ दी जानेरो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकलं तर यावेळी त्यांनी कांस्यपदक जिंकलं. 2019 मध्ये, बेलेनियुक हे युक्रेनियन संसदेचे पहिले कृष्णवर्णीय सदस्य बनले आणि सर्व्हंट ऑफ द पीपल राजकीय पक्षाचे सदस्य म्हणून निवडून आले.
युक्रेनच्या भविष्याची चिंता :पॅरिसमधील त्यांच्या शानदार कामगिरीनंतर, त्यांनी रशियाबरोबरच्या युद्धादरम्यान आपल्या देशाच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त केली. "आज, मी पदक जिंकू शकलो याचा मला खूप आनंद आहे. पण माझ्यासाठी, एक युक्रेनचा नागरिक आणि एक युक्रेनचा खेळाडू या नात्यानं, भविष्यात युक्रेनचं असणं खूप महत्त्वाचं आहे. दुर्दैवानं आम्हाला आमच्या भविष्याबद्दल माहिती नाही." असं त्यांनी म्हटलंय. टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्यांनी वर्णद्वेषाच्या त्यांच्या अनुभवांबद्दल बोलले आणि बदलाच्या समर्थनासाठी त्यांच्या व्यासपीठाचा वापर केला आहे. कुस्तीमधील त्यांची कारकीर्द पूर्वग्रहांना तोंड देण्याच्या आणि समानतेला चालना देण्याच्या त्यांच्या निर्धारामुळं चिन्हांकित आहे.
हेही वाचा :
- विनेश फोगटच्या आधी 'या' खेळाडूला CAS कोर्टातून मिळाला न्याय; अमेरिकन खेळाडूकडून जिंकलं 'कांस्यपदक' - paris olympic 2024
- पॅरिस ऑलिम्पिकची आज 'क्लोजिंग सेरेमनी'; भारतात कधी, कुठे आणि कसे पाहता येणार लाईव्ह? - Paris Olympics Closing Ceremony
- अमेरिकेपेक्षा कमी पदकं जिंकूनही चीन ऑलिम्पिक पदकतालिकेत अव्वल स्थानी; 91 देशांमध्ये भारताचा कितवा क्रमांक? - Olympics 2024 Medal Tally