Paris Olympic 2024 :भारतीय बॉक्सर प्रीती पवार हिनं पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये शानदार कामगिरी करत विजयानं सुरुवात केली. प्रीतीनं महिलांच्या 54 किलो गटात व्हिएतनामच्या वो थी किम आन्हावर विजय मिळवला. तिनं उपांत्यपूर्व फेरीध्ये स्थान मिळवलं आहे. प्रीतीनं आन्हाचा 5-0 असा पराभव केला. तिचा सामना जागतिक चॅम्पियनशिप रौप्यपदक विजेता कोलंबियाच्या मार्सेला येनी एरियासशी होईल.
बॉक्सर प्रीतीचा विजयी पंच; किम आन्हाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत मिळवलं स्थान - Paris Olympics 2024 - PARIS OLYMPICS 2024
Paris Olympic 2024 : भारतीय बॉक्सर प्रीती पवारनं 54 किलो गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. प्रीती पवारनं व्हिएतनामच्या वो ति किम आहचा 5-0 ने पराभव केला.
Published : Jul 28, 2024, 11:14 AM IST
दुसऱ्या फेरीत जबरदस्त कमबॅक :भारताची बॉक्सर प्रीती पवारचा रात्री 12.10 मिनिटांनी काल सामना पार पडला. यात पहिल्या राउंडमध्ये प्रीती 2-3 ने पिछाडीवर होती. परंतु त्यानंतर तिनं दुसऱ्या फेरीमध्ये जबरदस्त कमबॅक करून 5-0 असा सामना वळवला. तिने भारतीय संघाला बॉक्सिगमधील पहिला विजय मिळवून दिला. प्रितीनं सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका स्वीकारली होती. तिला याचा फायदा झाला. 20 वर्षीय प्रीती पवारनं गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला तिच्याकडून पदकाची आशा आहे.
हेही वाचा
- पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज पीव्ही सिंधूसह 'हे' दिग्गज खेळाडू दाखवणार प्रतिभा - Paris Olympics 2024
- ऑलिम्पिकमध्ये पुरुष हॉकी संघाची दमदार सुरुवात, न्यूझीलंडचा केला पराभव; 'या' खेळाडूंनी केले गोल - Paris Olympics 2024
- 'लंकादहना'नं भारतीय क्रिकेटमध्ये 'गंभीर' युगाची सुरुवात; कर्णधार सूर्यासह गोलंदाजांची 'यशस्वी' कामगिरी - IND vs SL T20I
- बॅडमिंटनमध्ये भारताचा डबल धमाका; सात्विक-चिरागची विजयी सुरुवात, यजमानांचा सरळ सेटमध्ये पराभव - Paris Olympics 2024