मुलतान PAK vs WI 2nd Test Live Streaming : पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज क्रिकेट संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना 25 जानेवारी (शनिवार) पासून मुलतानमधील मुलतान क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. 2021 मध्ये दक्षिण आफ्रिकेवर 2-0 असा विजय मिळवल्यानंतर घरच्या मैदानावर पहिला क्लीन स्वीप करण्याचं पाकिस्तानचं उद्दिष्ट असल्यानं हा सामना खूप महत्त्वाचा आहे. इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या दोन सामन्यांमधील विजय आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या मागील सामन्यासह घरच्या मैदानावर झालेल्या तीन सामन्यांच्या विजयाच्या मालिकेवर स्वार होऊन, पाकिस्ताननं मालिकेच्या पहिल्या सामन्यात व्यापक कामगिरीसह आपलं श्रेष्ठत्व दाखवून दिलं.
पहिल्या सामन्यात काय झालं : पहिल्या कसोटीत, पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाजीचे वर्चस्व त्यांच्या यशाचं गमक होतं. 251 धावांचं लक्ष्य राखताना, त्यांनी दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचा डाव फक्त 123 धावांत गुंडाळला. ऑफस्पिनर साजिद खाननं शानदार कामगिरी केली, दुसऱ्या डावात उल्लेखनीय पाच बळी घेतले आणि उपखंडीय परिस्थितीत सामना जिंकणारा गोलंदाज म्हणून त्याची प्रतिष्ठा कायम ठेवली. फलंदाजीतही संघानं प्रभावी योगदान दिलं.
दोन्ही संघाचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजमध्ये आतापर्यंत एकूण 55 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यात पाकिस्ताननं वर्चस्व गाजवलं आहे. पाकिस्ताननं 54 पैकी 22 कसोटी सामने जिंकले आहेत. तर वेस्ट इंडिजनं 18 कसोटी सामने जिंकले आहेत. याशिवाय, 15 सामने अनिर्णित राहिले आहेत. आकडेवारीवरुन असं दिसून येते की पाकिस्तानचा संघ अधिक मजबूत आहे. पाकिस्तानला घरच्या मैदानावर मालिका क्लीन स्वीप करायची आहे.
WTC मध्ये शेवटची मालिका : हे दोन्ही संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2023-25 च्या सायकलमध्ये त्यांची शेवटची मालिका खेळतील. तथापि, ही मालिका दोन्ही संघांना त्यांचा खेळ सुधारण्याची संधी देईल कारण दोन्ही संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचू शकले नाहीत. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत शान मसूद पाकिस्तानचं नेतृत्व करेल. तर वेस्ट इंडिजची धुरा क्रेग ब्रेथवेटच्या खांद्यावर असेल.
1980 मध्ये जिंकली शेवटची मालिका : वेस्ट इंडिज 18 वर्षानंतर पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका खेळण्यासाठी जात असली तरी त्यांना पाकिस्तानच्या भूमीवर कसोटी मालिका जिकण्यात फारस यश आलेलं नाही. त्यांनी शेवटच्या वेळी डिसेंबर 1980 मध्ये झालेली 4 सामन्यांची कसोटी मालिका 1-0 नं जिंकली होती. यानंतर त्यांना पाकिस्तानच्या भूमीवर मालिका जिंकता आलेली नाही. या मालिकेतही पहिला सामना गमावल्यानं त्यांना आता मालिका विजयाची संधी नाही पण हा सामना जिंकत ते मालिकेत बरोबरी करण्याचा नक्कीच प्रयत्न करतील.
पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना कधी आणि कुठं खेळला जाईल?